वाशिम : रामनवमी आणि संत सेवालाल महाराज जन्मोत्सवानिमित्त बंजारा समाजाची काशी म्हणून जगप्रसिद्ध असलेल्या श्री क्षेत्र पोहरादेवी येथे ४ एप्रिलला मुख्य यात्रा भरणार आहे. यात्रेची जय्यत तयारी करण्यात आली असून, देशभरातून भाविक मोठ्या संख्येने पोहरादेवीत दाखल होत आहेत.पोहरादेवी येथे संत सेवालाल महाराज, देवी जगदंबा, शामकीमाता, ज्योतीबाबा, संत बाबनलाल महाराज, संत रामराव महाराज यांचे मोठ्या आस्थेने दर्शन घेवून भाविक आपला नवस फेडतात. ४ एप्रिल हा यात्रेचा मुख्य दिवस असून, संत सेवालाल महाराज यांच्या समाधीस्थळी नतमस्तक होण्यासाठी भाविकांची गर्दी जमत आहे. यात्रेदरम्यान भाविकांची गैरसोय होऊ नये म्हणून पोहरादेवी संस्थान, स्थानिक प्रशासन, तालुका व जिल्हा प्रशासन, स्वयंसेवक परिश्रम घेत आहेत. पोहरादेवीत दाखल झालेल्या महिला विविध प्रकारच्या कला व बंजारा नृत्य सादर करीत आनंदोत्सवात सहभागी होत असल्याचे पाहावयास मिळते.
पोहरादेवी यात्रेची जय्यत तयारी
By admin | Published: April 03, 2017 5:03 PM