......................
नियम पाळण्याचे पोलिसांचे आवाहन
वाशिम : ‘डेल्टा प्लस व्हेरियंट’च्या पार्श्वभूमीवर जिल्हा प्रशासनाने काही दिवसांपासून पुन्हा निर्बंध लागू केले. यासंबंधीच्या नियमांचे पालन करावे, असे आवाहन पोलीस प्रशासनाकडून करण्यात येत आहे. त्यानुषंगाने दुपारी चारनंतर शहरात गस्त घातली जात आहे.
......................
पॅसेंजर रेल्वे सुरू करण्याची मागणी
वाशिम : येथून हिंगोली, नांदेड व अकोला याठिकाणी कामानिमित्त नियमित ये-जा कराव्या लागणाऱ्या नागरिकांना पॅसेंजर रेल्वेचा पर्याय आर्थिकदृष्ट्या परवडणारा होता. त्यामुळे ही रेल्वे सुरू करावी, अशी मागणी होत आहे.
...............
सिलिंडरचे दर कमी करण्याची मागणी
वाशिम : मध्यंतरी ऑक्सिजन सिलिंडरचा मोठ्या प्रमाणात तुटवडा निर्माण झाला होता. तेव्हा त्याचे दरही वाढविण्यात आले होते. आता मात्र गरज कमी झाल्याने पुरेशा प्रमाणात सिलिंडर उपलब्ध होत असून, दर कमी करण्याची मागणी होत आहे.
................
खरीप पेरणीची कामे खोळंबली
वाशिम : जिल्ह्यात काही भागात दमदार पाऊस झाला. यामुळे शेतकऱ्यांनी खरीप हंगामातील पिकांच्या पेरणीचे काम आटोपते घेतले; मात्र अधिकांश ठिकाणी पावसाने दडी मारल्याने पेरणीची कामे खोळंबली आहेत.
....................
बाजारपेठेत गर्दी टाळण्याचे आवाहन
वाशिम : नागरिकांची गैरसोय टळावी, या उद्देशाने जिल्हा प्रशासनाने दुपारी चार वाजेपर्यंत दुकाने सुरू ठेवण्यास मुभा दिली; मात्र तोपर्यंतच बाजारपेठेत तोबा गर्दी होत आहे. गर्दी टाळण्याचे आवाहन नगर परिषद प्रशासनाकडून करण्यात आले.