धनंजय कपाले /वाशिम : शहर पोलीस स्टेशनअंतर्गत असलेल्या ३८ मोहल्ल्यातील सुरक्षेची जबाबदारी केवळ तीन ह्यबिट मार्शलह्ण सांभाळत आहेत. नेमका या संधीचा फायदा उचलून चोरटे आपले काम फत्ते करीत असल्याच्या मोठमोठय़ा दोन घटना १५ दिवसांच्या कालावधीत घडल्या. वाशिम शहर पोलीस स्टेशन अंतर्गत दीड वर्षापूर्वी तत्कालीन पोलीस अधीक्षक सुधीर हिरेमठ यांच्या कार्यकाळात चोरीच्या घटना व इतर गुन्हेगारीवर नियंत्रण ठेवण्यासाठी सात बिट मार्शल दिवस पाळीत व सात बिट मार्शल रात्र पाळीमध्ये गस्तीवर असायचे. परिणामी, शहरातील गुन्हेगारीवर बर्याच अंशी आळा बसला होता. हिरेमठ यांची बदली झाल्यानंतर हळूहळू ह्यबिट मार्शलह्णची संख्या कमी करून ती आजमितीला केवळ तीनवर आणण्यात आली आहे.
शहराच्या सुरक्षेचा भार केवळ तीन ‘बिट मार्शल’वर
By admin | Published: June 20, 2015 2:56 AM