.....................
किन्हीराजा परिसरात पाणीटंचाईचे सावट
वाशिम : मे महिन्याच्या सुरुवातीलाच किन्हीराजा परिसरातील गावांमघ्ये पाणीटंचाईचे सावट निर्माण झाले आहे. नियमित पाणीपुरवठा होत नसल्याने नागरिकांना कृत्रिम पाणीटंचाईला सामोरे जावे लागत आहे.
......................
हळद विक्रीसाठी बाजारपेठेचा अभाव
वाशिम : शिरपूर व परिसरात हळद उत्पादक शेतकऱ्यांची संख्या अधिक आहे. असे असताना हळद खरेदी व विक्री व्यवहारासाठी परिसरात बाजारपेठ नसल्याने शेतकऱ्यांची गैरसोय होत आहे.
..................
रेशन दुकानांमध्ये नियमांचे पालन
वाशिम : कोरोना विषाणू संसर्गाचा प्रादुर्भाव लक्षात घेता ई-पास मशीनवर लाभार्थींचा अंगठा घेणे बंद करण्यात आले आहे. त्याऐवजी संबंधित दुकानदारांचा अंगठा ग्राह्य धरण्यात आला असून, नियमांचे पालन करत धान्य वितरण सुरू आहे.
.................
अर्थसहाय्य मिळण्याकडे कलावंतांचे लक्ष
वाशिम : कोरोना महामारीत सार्वजनिक कार्यक्रमांवर बंदी असल्याने लोककलावंतांना कोणतेही सरकारी किंवा खासगी काम मिळाले नाही. या पार्श्वभूमीवर शासन अर्थसहाय्य करणार का, याकडे लोककलावंतांचे लक्ष लागून आहे.
....................
दीड हजारांवर नागरिक अनुदानापासून वंचित
वाशिम : ग्रामीण भागात राबविण्यात येणाऱ्या पंतप्रधान आवास योजना व रमाई आवास योजनेंतर्गत जिल्ह्यातील दीड हजारावर नागरिकांना दुसऱ्या टप्प्यातील अनुदान अद्याप मिळालेले नाही.
...................
धूर फवारणी करण्याची मागणी
वाशिम : ग्रामीण भागात डासांचा प्रादुर्भाव वाढत असल्याने डास प्रतिबंधक धूर फवारणी करणे गरजेचे आहे. याकडे जऊळका जिल्हा परिषद गटातील ग्रामपंचायतींनी लक्ष द्यावे, अशी मागणी नागरिकांनी सोमवारी केली.
........................
पशुसंवर्धन विभागात वर्ग दोनची पदे रिक्त
वाशिम : पशुसंवर्धन विभागातील डॉक्टरांच्या रिक्त पदांचे ग्रहण पशुपालकांना आर्थिक संकटात ढकलत असल्याचे वास्तव आहे. श्रेणी एक व दोनच्या रुग्णालयातील तब्बल २३ डॉक्टर व इतर कर्मचाऱ्यांची पदे रिक्त आहेत.
...........
ग्रंथालय सेवकांच्या बँक खात्याचा तपशील अप्राप्त
वाशिम : आकृतीबंधानुसार शासनमान्य सार्वजनिक ग्रंथालयांतील मंजूर पदांवर कार्यरत सेवकांच्या थेट बँक खात्यात वेतन जमा करण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे; मात्र यासंबंधी वारंवार आवाहन करूनही अनेक ग्रंथालय सेवकांच्या बँक खात्यांचा तपशील अप्राप्त आहे.
.............
नाले सफाई, रस्ता दुरूस्तीची मागणी
वाशिम : राशहतील आनंदवाडी प्रभागात नाल्यांची सफाई, रस्ता दुरुस्ती रखडली आहे. प्रभागात असलेला हातपंपही नादुरूस्त आहे. उद्भवलेल्या समस्या निकाली काढाव्यात, अशी मागी मनसेने केली आहे.
.................
धोकादायक पूलाच्या दुरूस्तीची मागणी
वाशिम : मालेगाव तालुक्यातील गोकसावंगी या गावावरून मेडशीकडे जाणाऱ्या रस्त्यावरील नदीवर असलेला पूल धोकादायक अवस्थेत आहे. सुरक्षा कठडे तुटल्यामुळे मोठा अपघात घडू शकतो. पुलाची दुरूस्ती करावी, अशी मागणी होत आहे.