लोकमत न्यूज नेटवर्कमानोरा : स्वच्छ भारत, स्वच्छ महाराष्ट्र अभियान यशस्वी करण्यासाठी सर्वांचा सहभाग अपेक्षीत आहे. येत्या १५ जुनपर्यंत मानोरा नगर पंचायत १०० टक्के हागणदारीमुक्त झाली पाहिजे हे शक्य आहे. फक्त ही लोकचळवळ झाली पाहिजे असे प्रतिपादन जिल्हाधिकारी राहूल व्दिवेदी यांनी केले.मानोरा नगर पंचायतीच्या सभागृहात स्वच्छ भारत अभियान सभेत अध्यक्षस्थानाहून बोलत होते. यावेळी नगराध्यक्ष रेखाताई पाचडे, जिल्हा प्रशासन अधिकारी दिपक मोरे, स्वच्छ भारत अभियान नगर विकास कक्ष मंत्रालय मुंबईचे सुहास चव्हाण, नायब तहसीलदार तायडे, ठाणेदार मळघणे, आदिंची उपस्थिती होती. यावेळी प्रथम मान्यवरांनी संत गाडगेबाबा यांचे प्रतिमेचे पुजन केले.यावेळी आपल्या भाषणात व्दिवेदी म्हणाले की, जिल्ह्यातील सर्वच नगर परिषद व नगर पंचायत १०० टक्क हागणदारीमुक्त करण्याचा आपला प्रयत्न आहे. चार न.प.झाल्या, मालेगाव न.प.चे ८० टकके काम झाले, मात्र मानोरा न.प. मागे आहे. केवळ २० टक्केच काम झाले. येत्या १५ जुनपर्यंत आपण सर्वांनी सहकार्य क रुन हे काम १०० टक्के करायचे आहे असे झाल्यास संपूर्ण जिल्हा हागणदारीमुक्त होईल व राज्यात वाशिम जिल्ह्याचा दुसरा क्रमांक लागेल. कारण सिंधुदुर्ग जिल्हा घोषीत झाला आहे. स्टाफ नाही असे कारण पुढे करु नका, शौचालय बांधण्यासाठी स्टाफची गरज नाही. नगरसेवक व लाभार्थीनी प्रयत्न करावे असेही ते म्हणाले. यावेळी नगराध्यक्ष रेखाताई पाचडे, दिपक मोरे, सुहास चव्हाण यांनी सुध्दा मनोगत व्यक्त केले. नगरसेवक अमोल राऊत यांनी नगर पंचायत १०० टक्के हागणदारीमुक्त करुन दाखवू असा विश्वास दिला. अतिशय प्रतिकुल परिस्थितीत शौचालय बांधणाऱ्या सुफियाबी अब्दूल शब्बीर पानवाले, सरस्वताबाई साळवे, सखुबाई मनोहर कलीया, या महिलांचा जिल्हाधिकारी याचेहस्ते सत्कार करण्यात आला.प्रास्ताविक नगर पंचायतीचे मुख्याधिकारी अमोल माळकर यांनी केल. ६१९ अर्ज लाभार्थींचे आले पैकी १२८ शौचालय पूर्ण झाले. १८८ चे काम प्रगतीपथावर आहे असेही त्यांनी सांगितले. येत्या १५ जुनपर्यंत सर्व नगरसेवकांनी सहकार्य केले तर निश्चित टार्गेट पूर्ण करु असा विश्वास त्यांनी दिला. संचालन माळकर यांनीच केले. बांधकाम अभियंता अमोल राठोड यांनी आभार व्यक्त केले.