लोकमत न्यूज नेटवर्कवाशिम: स्वच्छ सर्वेक्षण (ग्रामीण) कार्यक्रमाच्या अंमलबजावणीत तसेच स्वच्छता अॅपवर प्रतिक्रिया नोंदविण्यात राज्यात वाशिम जिल्हा ‘डेंजर झोन’ अर्थात सर्वात पिछाडीवर असल्याची बाब जिल्हा परिषद प्रशासनाने गांभिर्याने घेतली आहे. स्वच्छता अॅपवर विभाग प्रमुखांना दहा हजार तर बीडीआेंना २० हजार प्रतिक्रिया नोंदविण्याचे उद्दिष्ट दिले असून, उद्दिष्टपूर्ती न करणाऱ्या अधिकाऱ्यांना कारवाईला सामोरे जावे लागणार आहे.गावात शाश्वत स्वच्छता राखण्यासाठी शौचालयाचा नियमित वापर, सांडपाणी व घनकचºयाचे व्यवस्थापन होणे आवश्यक आहे. त्यानुषंगाने स्वच्छ सर्वेक्षण मोहिमेचा प्रथम टप्पा यशस्वी झाल्यानंतर आता दुसºया टप्प्यातील ‘ओडीएफ’ पडताळणी प्रक्रिया राबविण्यात येत आहे. २३ आॅगस्टपासून स्वच्छ सर्वेक्षण -२०१९ (ग्रामीण) अंतर्गत स्वच्छता अॅपवर अधिकाधिक प्रतिक्रिया नोंदविण्यासाठी जनजागृती केली जात आहे. तथापि, या जनजागृतीला अद्यापही वेग नसल्याने ५ सप्टेंबरपर्यंत राज्यात वाशिम जिल्हा सर्वात पिछाडीवर होता. वाशिम जिल्ह्यात ५ सप्टेंबरपर्यंत स्वच्छता अॅपवर केवळ ३४४ प्रतिक्रिया नोंदविण्यात आल्या.स्वच्छतेसंदर्भात रँक ठरविण्यासाठी केंद्र शासनाचे पथक गावात येऊन तपासणी करणार आहे. तसेच स्वच्छ सर्वेक्षण ग्रामिण २०१९ अंतर्गत मोबाईलवर नागरिकांचा फिडबॅक नोंदविण्याची कार्यवाहीदेखील केली जात आहे. यामध्ये वाशिम जिल्हा माघारल्याची बाब मुख्य कार्यकारी अधिकारी दीपक कुमार मीना यांनी चांगलीच गांभीर्याने घेतली असून, विभाग प्रमुखांसह सर्व गटविकास अधिकाºयांना स्वच्छता अॅपवर प्रतिक्रिया नोंदविण्यासाठी उद्दिष्ट दिले आहे. १५ सप्टेबर २०१९ पर्यंत गटविकास अधिकाºयांना तालुक्यातून किमान २० हजार नागरिकांचे मोबाइलवर अभिप्राय (प्रतिक्रिया) नोंदविण्याचे उद्दिष्ट दिले. तसेच विभाग प्रमुखांना १० हजार नागरिकांचे अभिप्राय नोंदविण्याचे उद्दिष्ट दिले आहे. उद्दिष्टपूर्ती न करणाºया अधिकाºयांविरूद्ध कारवाई करण्याचा इशारा जिल्हा परिषद प्रशासनाने दिला.
स्वच्छता अॅपवर केवळ ३४४ प्रतिक्रिया !स्वच्छ सर्वेक्षण - २०१९ (ग्रामीण) अंतर्गत राज्यभरात स्वच्छता अॅपवर प्रतिक्रिया नोंदविण्याची कार्यवाही सुरू आहे. या प्रतिक्रियवर स्वच्छतेची रँक अवलंबून राहणार आहे. राज्यात ५ सप्टेंबर पर्यंत नाशिक जिल्हा प्रथम क्रमांकावर असून, ८१ हजार ६८५ प्रतिक्रिया नोंदविण्यात आल्या. पश्चिम वºहाडातील बुलडाणा जिल्हा १६ व्या क्रमांकावर असून ३५९४ प्रतिक्रिया नोंदविण्यात आल्या. अकोला जिल्हा २३ व्या क्रमांकावर असून, १५४८ प्रतिक्रिया नोंदविण्यात आल्या तर वाशिम जिल्हा सर्वात पिछाडीवर अर्थात ३४ व्या क्रमांकावर असून, केवळ ३४४ प्रतिक्रिया नोंदविण्यात आल्या.