-------
रिक्त पदांमुळे वीजग्राहकांना अडचणी
वाशिम : मेडशी महावितरण कार्यालयात लाईनमनची तीन पदे रिक्त आहेत. या केंद्रांतर्गत घरगुती आणि शेतकरी मिळून १३०० ग्राहकांच्या समस्या सोडविण्यासाठी एकच लाईनमन आहे. वीजपुरवठा खंडित झाल्यास शेतकऱ्यांसह घरगुती वीजग्राहकांना अनेक अडचणींचा सामना करावा लागतो.
^^^^^^^^^
पाणंद रस्त्याअभावी शेतकऱ्यांचे हाल
वाशिम : मानोरा तालुक्यात सर्वांगीण विकासासाठी अनेक ठिकाणी रस्त्याची कामे सुरू असली तरी पाणंंद रस्त्याचे प्रश्न आजही प्रलंबित आहेत. त्यात आसोला ते गव्हा या पाणंद रस्त्याचे काम अर्धवट राहिल्याने अनेक शेतकऱ्यांच्या शेतात साहित्याची ने-आण करताना हाल होत आहेत.
^^^^^
इंझोरी-म्हसणी रस्त्यावर सर्वत्र चिखल
इंझोरी : मानोरा तालुक्यातील इंझोरी-म्हसणी रस्त्याची अवस्था अत्यंत दयनीय झाली आहे. या रस्त्यावरील डांबर पूर्णपणे नाहीसे झाले असून, सात किलोमीटर अंतराच्या रस्त्यावर केवळ माती आणि खड्डेच दिसत आहेत. त्यामुळे या रस्त्यावर सर्वत्र चिखल झाला आहे.