वाशिम - जिल्हा परिषदेच्या जिल्हा पाणी व स्वच्छता विभागाने २२ जून रोजी दुपारी जिल्हा परिषदेत स्वच्छ भारत मिशनशी (ग्रामीण) संबंधित कामकाजाचा आढावा घेतला.ग्रामीण भाग स्वच्छ व सुंदर बनविण्याबरोबरच हगणदरीमुक्त करण्यासाठी जिल्हा परिषद प्रशासनाने गत तीन-चार वर्षांपासून विशेष मोहिम राबविली. सर्वांच्या सहकार्यातून वाशिम जिल्ह्यात १ लाख ९० हजार ८५४ शौचालय बांधकामाचे उद्दिष्ट मार्च महिन्यातच पूर्ण झाले. यामध्ये कारंजा तालुक्यात २८ हजार ७३८, मालेगाव तालुक्यात ३४ हजार ९२७, मंगरूळपीर तालुक्यात २८ हजार ८३७, मानोरा तालुक्यात ३० हजार २२, रिसोड तालुक्यात ३५ हजार ७१, वाशिम तालुक्यातील ३३ हजार २५९ शौचालय बांधकामाचा समावेश आहे. आता स्वच्छ भारत मिशनच्या दुसºया टप्प्यातील कामांवर भर देण्यात आला आहे. बांधलेल्या शौचालयाचा पूर्णपणे वापर, सांडपाणी व घनकचºयाचे व्यवस्थापन, पाणी गुणवत्ता व सार्वजनिक शौचालये, शोषखड्डे यासह शौचालयाचे अचूक छायाचित्र शासनाच्या संकेतस्थळावर अपलोड करणे, स्वच्छता निर्देशांक, संत गाडगेबाबा ग्राम स्वच्छता अभियानांतर्गत ग्रामपंचायतीचे प्रभाग व जिल्हा परिषद गणाला मिळणारा पुरस्कार, त्यासाठी ग्रामपंचायतींनी करावयाची तयार ी आणि १ ते ३० आॅक्टोबर दरम्यान प्रभागनिहाय स्पर्धेला होणारी सुरूवात यासंदर्भात शुक्रवारच्या आढावा बैठकीत चर्चा करण्यात आली. या बैठकीला जिल्हा स्वच्छता कक्षातील अधिकारी, कर्मचाºयांसह तालुकास्तरीय कर्मचाºयांची उपस्थिती होती.
स्वच्छता विभागाने घेतला विविध कामकाजाचा आढावा !
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 22, 2018 3:20 PM
वाशिम - जिल्हा परिषदेच्या जिल्हा पाणी व स्वच्छता विभागाने २२ जून रोजी दुपारी जिल्हा परिषदेत स्वच्छ भारत मिशनशी (ग्रामीण) संबंधित कामकाजाचा आढावा घेतला.
ठळक मुद्देहगणदरीमुक्त करण्यासाठी जिल्हा परिषद प्रशासनाने गत तीन-चार वर्षांपासून विशेष मोहिम राबविली. सर्वांच्या सहकार्यातून जिल्ह्यात १ लाख ९० हजार ८५४ शौचालय बांधकामाचे उद्दिष्ट मार्च महिन्यातच पूर्ण झाले. १ ते ३० आॅक्टोबर दरम्यान प्रभागनिहाय स्पर्धेला होणारी सुरूवात यासंदर्भात शुक्रवारच्या आढावा बैठकीत चर्चा करण्यात आली.