लोकमत न्युज नेटवर्क शेलूबाजार (वाशिम): श्रींच्या प्रकटदिनानिमित्त महाप्रसाद वितरणानंतर साचलेला कचरा आणि घाणीमुळे भाविकांना दुर्गंधीचा त्रास होऊ नये, मंदिर परिसर स्वच्छ राहावा, या उद्देशाने नैसर्गिक पर्यावरण संवर्धन व मानवता विकास वसुंधरा टीमच्याच्या पुढाकारातून महिलांनी १६ फेब्रुवारीला शेलूबाजार येथील श्री संत गजानन महाराजांच्या मंदिर परिसरात स्वच्छता अभियान राबविण्यात आले.शनिवार १५ फेब्रुवारी रोजी संत गजानन महाराज यांच्या प्रकट दिनानिमित्त विविध ठिकाणच्या मंदिरात महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले होते. त्यानंतर तेथे पत्रावळ्या, कागदी ग्लास, द्रोण, आदिंचा बराच कचरा जमा झाला होता. शेलुबाजार येथील गजानन महाराज मंदिर परिसरातही असा कचरा साचला होता. त्यामुळे भाविकांना दुर्गंधीचा त्रास होऊ नये, म्हणून नैसर्गिक पर्यावरण संवर्धन व मानवता विकास वसुंधरा टीमच्यावतीने महिलांनी या ठिकाणी स्वच्छता अभियान राबविले. या कार्यक्रमाला सचिन डोफेकर, मोहन राऊत, सुधाकर भांडेकर, अजय अग्रवाल मधुकर डोके, अजय परसे तसेच टीमच्या सदस्य राधा मुरकुटे, मंगरूळपीर तालुका अध्यक्ष तेजस्विनी काळे, महिला संघर्ष समितीच्या अध्यक्षा जयश्री शर्मा, वाशिम जिल्हा उपाध्यक्ष मिरा बोरसे, सुनंदा कानवले, पार्वती गावंडे, उज्वला खोपे, मंगला लांभाडे, लिना जुंगाडे, जयश्री उजवणे, पार्वती मुळे, अन्नपूर्णा गायके, सत्यभामा सावके, सुनिता मुळे, सपना जामकर, कार्यक्रमाला उपस्थित होत्या.
गजानन महाराज मंदिर परिसरात स्वच्छता अभियान
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 17, 2020 3:10 PM