वाशिम : आपले शहर स्वच्छ व सुंदर रहावे यासाठी वाशिम नगरपालिका नेहमीच पुढाकार घेतांना दिसून येत आहे. शहरातील उपक्रमामुळे राज्यस्तरावर वाशिम नगरपालिकेचे नाव झळकले आहे. आता वाशिम नगरपरिषदेचे मुख्याधिकारी गणेश शेटे यांनी शहर स्वच्छतेसाठी ‘स्वच्छता दूत’ शहरात फिरवून याबाबत जनजागृती उपक्रम हाती घेतला आहे. या उपक्रमास त्यांना विविध शाळा, कॉलेजमधील विद्यार्थ्यांसोबतच युवकांचा सहभाग लाभत आहे. त्यांच्या या अनोख्या उपक्रमाचे सर्वत्र कौतूकही केल्या जात आहे. यापूर्वी असा उपक्रम कोणी घेतला नसल्याने शहरात या उपक्रमाची जोरदार चर्चा होत आहे.
नगर परिषदेचे मुख्याधिकारी गणेश शेटे यांनी सुचित केल्यानुसार गत पंधरा दिवसापूर्वीपासून शहरातील अनेक भागात शाळेचे विद्यार्थी, युवक हातात फलक घेवून स्वच्छतेचे महत्व विषद करुन नागरिकांना स्वच्छतेचे महत्व विषद करीत आहेत. विशेष म्हणजे या उपक्रमात शासनाचा ‘स्वच्छता अॅप’ बाबत माहिती देवून ते अनेकांना डाऊनलोड करुन देणे, शेअर ईट ने त्यांच्या भ्रमणध्वनीमध्ये टाकून ते कसे वापरावे याबाबत मार्गदर्शन केल्या जात आहे. या अॅपचा वापर नागरिकांनी सुरु केल्यास शहर कसे स्वच्छ राहू शकते याबाबत सविस्तर माहिती स्वच्छता दुतांकडून दिल्या जात आहे. शहरातील फळ विक्रते, भाजीपाला विक्रेते तसेच किराणा दुकान, जनरल स्टोअर्समध्ये जाऊन नागरिकांना स्वच्छतेचा संदेश दिला जात आहे. प्लास्टिक पिशव्या मानवी आरोग्य तथा पर्यावरणास कशा घातक आहेत, हे पटवून सांगताना आपण प्लास्टिकच्या पिशव्यांचा वापर करू नका, असे आवाहन करण्यात येत आहे.
‘स्वच्छता अॅप’ चा असा होतो वापर
शासनाने तयार केलेला व्हॉटस अॅपवरील ‘स्वच्छता अॅप’चा वापर सर्वांना समजेल असा आहे. सदर अॅप उघडल्यानंतर त्यामध्ये आपल्या भागात असलेल्या घाणीबाबत माहिती टाकावी लागते. त्यामध्ये आपला वार्ड क्रमांकासह परिसर कोणता याबाबत प्रश्न असून ते भरुन पाठवायचे आहे. हे पाठविल्यानंतर काही तासातच आपल केलेल्या तक्रारीचे निरासण होत आहे. यामध्ये आपण एखादया परिसरात साचलेल्या घाणीचा फोटो अपलोड केला की खाली विचारलेली माहिती भरल्यास याची कल्पना येते व ताबडतोब त्याचे निरासरण सुध्दा करण्यात येत आहे.
शहर स्वच्छ व सुंदर बनविण्यासाठी नागरिकांचे सहकार्य आवश्यक आहे. शासनाच्या ‘स्वच्छता अॅप’ सर्व अधिकारी व कर्मचाºयांना डाऊनलोड करुन त्यांच्या ओळखीच्यांना ते पाठविण्यास सांगितले. आज शहरातील निम्या लोकांच्या मोबाईलमध्ये हे अॅप आजच्या घडीला दिसून येत आहे. या अॅपमुळे शहरातील प्रत्येक नागरिक अस्वच्छतेचे छायाचित्र पाठवून तो परिसर काही तासात स्वच्छ करुन घेवू शकतो. त्याकरिता नागरिकांनी याचा वापर करुन ‘शहर स्वच्छ व सुंदर’ करण्यासाठी पुढाकार घ्यावा.
- गणेश शेटे, मुख्याधिकारी, नगरपरिषद वाशिम