लोकमत न्यूज नेटवर्कवाशिम : स्वत: हलाखीचे जीवन जगून दुसºयांसाठी काही तरी करण्याची जिद्द असलेले कमीच, परंतु वाशिम शहरातील सदानंद तायडे हा युवक त्यापासून अपवाद आहे. शिक्षणापासून वंचित असलेल्या मुलांचा शोध घेवून त्यांना शिक्षणाचे धडे देणाºया या ध्येयवेडया युवकाने चक्क आता पंढरपूर येथे जावून गाडगेबाबांच्या वेशभूषेत स्वच्छतेचा संदेश भाविकांपर्यंत पोहचविण्याचे कार्य केले. त्यांच्या या कार्याचे भाविकांनी कौतूक केले.वाशिम येथील सदानंद तायडे यांनी वाशिम शहरातही स्वच्छतेबाबत जनजागृतीसाठी घोंगडी (पोत्याचाड्रेस) परिधान करुन शहराची स्वच्छता केलेली आहे. ग्रामीण भागातही त्यांनी याबाबत जनजागृती करुन नागरिकांना स्वच्छता ठेवण्याचे आवाहन केले. यावेळी त्यांनी पंढरपूर येथे आषाढीनिमित्त जावून तेथील स्वच्छता व भाविकांना स्वच्छतेचे धडे दिले. सदानंद तायडे यांच्या कार्याचे कौतूकवाशिम येथील सदानंद तायडे स्वत: फुलांचा व्यवसाय करीत आपले शिक्षण पूर्ण करतो. शिक्षण घेतांना येणााºया अडचणी लक्षात घेवून झोपडपट्टीमध्ये जावून शिक्षणाचे धडे गिरविण्याच्या कार्यासह ते शहरामध्ये भोंगा घेवून मायबाप हो...घरोघरी शौचालय बांधा’, आपला परिसर स्वच्छ ठेवा असे रस्त्यावर उभे राहून जनजागृती करीत आहे. आषाढी एकादशीनिमित्त पंढरपूर येथे जावून त्यांनी स्वच्छतेचा संदेश दिला त्यांच्या या कार्याचे सर्वत्र कौतूक होत आहे.