वाशिम : संजय गांधी निराधार योजने अंतर्गत एका विधवा महिलेला तिच्या हक्काचे थकीत अनुदान खात्यात जमा करणेसाठी एक हजाराची लाच स्विकारताना कनिष्ठ लिपीक विठ्ठल कांबळे याला अँन्टी करप्शन ब्युरोच्या पथकाने रंगेहात पकडले. ही कारवाई आज ३ जुलै रोजी दुपारी १२ वाजताचे सुमारास केली. प्राप्त माहितीनुसार वाशिम तहसिल कार्यालयामधील संजय गांधी निराधार योजना कार्यालयामध्ये एका विधवे महिलेचे फेब्रुवारी २0१४ ते जुन २0१४ या कालावधीमधील प्रत्येकी ६00 रूपये महिण्याप्रमाणे एकुण ३000 रूपये थकित होते. सदर रक्कम लाभार्थी विधवा महिलेने खात्यात जमा करण्यासाठी कनिष्ठ लिपीक विठ्ठल शिवाजी कांबळे याला वारंवार विनंती केली. मात्र, कांबळे याने सदर रक्कम खातेमध्ये जमा करणेसाठी एक हजार रूपयाची मागणी केली. लाभार्थी महिलेच्या नातेवाईकाने वाशिम येथील अँन्टी करप्शन ब्युरो कार्यालयामध्ये २३ जुन रोजी तक्रार दाखल केली. या तक्रारीहून अँन्टी करप्शन ब्युरोच्या पथकाने २३ जुन रोजी संजय गांधी निराधार योजनेचे कार्यालयामध्ये गोपनीयरित्या जाऊन पंचा समक्ष कांबळे याने एक हजाराची मागणी करून स्विकारण्याचे कबुल केले. त्यानुसार तक्रारदाराने ३ जुलै रोजी पैसे देण्याचे लिपीक कांबळे याचेसोबत बोलणी केली. आज ३ जुलै रोजी तक्रारदाराने अँन्टी करप्शन ब्युरोचे पथक व साक्षीदारासमोर कांबळे याला एक हजार रूपये दिले. कांबळे याने सदर रक्कम स्विकारल्यानंतर लगेचच अँन्टी करप्शन ब्युरोच्या पथकाने कांबळेला लाचेच्या रकमेसह अटक केली.
विधवा अनुदानासाठी लाच मागणारा लिपीक गजाआड
By admin | Published: July 03, 2014 11:40 PM