००००००
असुविधांमुळे प्रवाशांमध्ये नाराजी
वाशिम : स्थानिक बसस्थानकावर पुरेशा सुविधा नसल्याने प्रवाशांना त्रास सहन करावा लागत आहे. पंखे बंद असून शुद्ध पाण्याचीही व्यवस्था नाही. स्वच्छतेचाही अभावच आहे.
०००००
बालकांची आधार नोंदणी प्रभावित
वाशिम : कोरोना विषाणू संसर्गाचा प्रादुर्भाव वाढल्याने ० ते ६ वर्षे वयोगटातील बालकांची आधार नोंदणी प्रभावित झाल्याचे चित्र पाहावयास मिळत आहे. अनेक बालकांची आधार नोंदणी झाली नाही.
०००
रोहित्र बदलून देण्याची मागणी
वाशिम : मेडशी जिल्हा परिषद गटातील नादुरुस्त विद्युत रोहित्र बदलून देण्याची मागणी शेतकऱ्यांनी शुक्रवारी महावितरणकडे केली. गेल्या महिनाभरापासून काही रोहित्र नादुरुस्त असल्याने वीज पुरवठा अधूनमधून खंडित होत आहे.
०००००
उभ्या वाहनांमुळे अपघाताचा धोका
वाशिम : राष्ट्रीय महामार्ग तथा शहरातील अंतर्गत रस्त्यांच्या कडेला वाहने उभी केली जातात. या वाहनांमुळे अपघाताचा धोका वाढला आहे. शहरात माल घेऊन येणारी वाहने नेहमीच अशी उभी केली जातात.
००००००
शासकीय समित्यांच्या गठनाची प्रतीक्षा!
वाशिम : संजय गांधी निराधार योजना यासह तालुकास्तरावर विविध समित्यांचे गठन अद्याप झाले नसल्याने या समित्यांचे गठन केव्हा होणार, याकडे लाभार्थ्यांचे लक्ष लागून आहे.