वाशिम: जिल्ह्यात तलाठी सज्जयावर काम करणार्या प्रत्येक तलाठय़ाने तलाठी कार्यालयात एक खाजगी ह्यरायटरह्ण ठेवून कधीही गावात, कार्यालयात न पोहचणार्या तलाठयांमुळे सर्वसामान्य नागरिक त्रस्त झाले होते. या संदर्भात २ जुलै रोजी राबविलेल्या स्टींग ऑपरेशनमधून बिंग फोडले. परिणामी जिल्हयातील तलाठी खळबळून जागे झाले. लोकमतच्या दणक्यामुळे ३ जूनला अनेक तलाठी कार्यालयाची बंद व्दारे उघडलीत. अनेक गावात बर्याच दिवसांपासून न गेलेला तलाठी गावात पोहचला.लोकमतच्या टीमने एकाच वेळी जिल्हयातील अनेक तलाठी सज्जांवर जावून तलाठी कार्यालयाच्या ह्यकारभाराचीह्ण पाहणी केली. यातून अनेक सत्य पुढे आले. कोठे तलाठी कार्यालय बंद तर कोठ केवळ कार्यालय उघडे असे प्रकार दिसून आले. हा सारा प्रकार ह्यटिम लोकमतनेह्ण टिपून स्टिंग केले होते. दुसर्या दिवशी ३ जुलै रोजी अनेक ग्रामीण भागासह खेडयापाडयात तलाठी पोहचल्याचे ग्रामस्थांनी सांगितले.सध्या शेतकर्यांना पीक कर्जासाठी , शासकीय कागदाची आवश्यकता असताना तलाठी जागेवर सापडत नसल्याने अनेकांना मनस्ताप सहन करावा लागत होता. ३ जुलै रोजी मात्र तलाठी गावात , कार्यालयात पोहचून जागेवर नागरिकांची कामे झाली. लोकमतने केलेल्या या स्टिंगचे अनेकांनी कौतूक केले तसेच वेळोवेळी असे स्टिंग करून प्रशासनाला जागे करत राहण्याची अपेक्षा व्यक्त केली.
तलाठी कार्यालयांची बंद दारे उघडली
By admin | Published: July 03, 2014 11:26 PM