मंगल कार्यालये, लग्न समारंभ आदी गोष्टींवर निर्बंध लादल्यामुळे बाजारपेठेतील ग्राहकवर्ग कमी झाला आहे. गेल्या मार्चपासून कापड दुकानदार पुरता परेशान आहे. त्यामुळे रिसोड शहरासह तालुक्यातील संपूर्ण व्यावसायिक अडचणीत आले आहेत. सध्या मार्च महिन्यापासून जूनपर्यंत कपडे खरेदी करण्यासाठी लोकांची झुंबड उडालेली असते. आता लग्न समारंभावर मर्यादा आल्या व मोठे समारंभ पार पडणे बंद झाले. तरी जनतेने शासनाने ठरवून दिलेल्या नियमावलीचे कठोर पालन करून लवकरात लवकर कोरोनाला हद्द पार केले पाहिजे. जेणेकरून सर्व व्यवसाय पुन्हा सुरळीत चालतील. लॉकडाऊन सध्या परवडणारे नाही. लॉकडाऊन करण्याची वेळ येऊ नये, यासाठी दक्षता हे आपले राष्ट्रीय कर्तव्य समजून सर्व जनतेने काळजी घ्यायलाच हवी.
सध्याच्या वातावरणात कोरोनाच्या दुसऱ्या लाटेमुळे बाजारपेठा थंडावल्या आहेत. कोरोना बाधितांचा आकडा दरराेज वाढतच असल्यामुळे शासनाने कडक पावले उचलली आहेत. त्यामुळे लग्न समारंभावर मर्यादा आल्या. कापड व्यवसाय व इतर अनेक व्यावसायिक अडचणीत आले आहेत.
- समाधान सानप
कापड दुकाहदार, भर जहागीर