लोकमत न्यूज नेटवर्कवाशिम: जिल्ह्यात शनिवार १ डिसेंबर रोजी सकाळपासून ढगाळ वातावरण निर्माण झाले आहे. या वातावरणामुळे तुरीचे पीक संकटात सापडले असून, या पिकावर किडीचा प्रादूर्भाव वाढण्याची भिती निर्माण झाली आहे.वाशिम जिल्ह्यात मागील काही दिवसांपासून वातावरणात सतत बदल होत आहे. या वातावरणाचा फटका पिकांना बसत आहे. मागील १५ दिवसांपूर्वी जिल्ह्यात ढगाळ वातावरण तयार होऊन अवकाळी पाऊसही पडला. यामुळे तुरीचा फुलोरा मोठ्या प्रमाणात गळून पडला. तर त्यानंतर धुके पडण्यास सुरुवात झाल्याने जिल्ह्यातील तब्बल ३०० हेक्टर क्षेत्रातील तुरीचे पीक कोमेजून शेतकºयांचे नुकसान झाले. या संकटातून शेतकरी सावरत असतानाच शनिवारी सकाळपासून जिल्ह्यात ढगाळ वातावरण तयार झाले. त्यामुळे शेंगावर किडींचा प्रादूर्भाव वाढण्यासह फुलोरा गळून पुन्हा शेतकºयांचे नुकसान होण्याची भिती निर्माण झाली आहे. यामुळे तूर उत्पादक शेतकरी संकटात सापडले आहेत. दरम्यान, जिल्ह्यात यंदा ५९६०० हेक्टर क्षेत्रावर तुरीची पेरणी झाली असून, सध्या निम्म्याहून अधिक क्षेत्रातील पिकाला शेंगाही आल्या आहेत. अशात ढगाळ वातावरणामुळे किडींचा प्रादूर्भाव झाल्यास उत्पादनात घट येण्यास मालाचा दर्जाही खालावण्याची भिती निर्माण झाली आहे.
वाशिम जिल्ह्यात ढगाळ वातावरण ; तूर पिक संकटात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 01, 2018 5:44 PM