राजकीय दृष्टया अतिशय प्रतिष्ठेची असलेली ही निवडणुकीत सहकार पॅनलने बाजी मारल्याचे २४ ऑगस्ट रोजी झालेल्या मतमोजणीवरुन दिसून आले. सकाळी ९ वाजता मतमोजणीस सुरुवात झाल्यानंतर सर्वप्रथम व्यापारी व अडते मतदार संघाच्या उमेदवारांचा निकाल जाहीर करण्यात आला. यामध्ये पाचव्यांदा पुरुषोत्तम तोष्णीवाल व दुसर्यांदा गोपाल काबरा यांची संचालकपदी निवड झाली. तदनतर हमाल व व्यापारी मतदार संघाच्या निवडणुकीमध्ये अवध्या ६ मतांनी सुभाष केदारे यांची दुसर्यांदा संचालकपदी निवड झाली. ग्रामपंचायत सर्वसाधारण मतदार संघातून गजानन बोडखे व धनश्याम मापारी यांची पहिल्यांदाच संचालकपदाकरिता निवडणुक लढविली व त्यात ते विजयी झालेत. आर्थीक दुर्बल घटक मतदार संघातून सुमनताई भुतेकर हे दुसर्यांदा निवडून आलेत तर अनुसूचित जाती मतदार संघातून कांता खरात हे विजयी झाल्यात. सेवा सहकारी संस्था मतदार संघातून विमुक्त जाती गटामधून कुंडलीक जायभाये तर ओबीसी मतदार संघातून डॉ. धिरज देशमुख यांचा विजय झाला. तसेच सेवा सहकारी संस्था महिला राखीव मतदार संघातून पुष्पा पाचरणो व गोदावरी मुटकुळे निवडून आल्यात. सेवा सहकारी संस्था राखीव महिला मतदारसंघामध्ये अतिशय चुरशीची लढत झाली. विरोधकावर केवळ २ मतांनी विजय येथे प्राप्त झाला. दोन मताचा फरक असल्याने फेरमतमोजणी प्रक्रीया करण्यात आली. सेवा सहकारी मतदार संघामध्ये अतिशय चुरस बघावयास मिळाली. अधिकृत घोषणा होईपर्यंत आकडयाची जुळवाजुळव सुरु होती. यामध्ये माजी सभापती गजाननराव पाचरणे यांनी ४४१ सर्वाधिक मते घेवून विजय मिळविला. या मतदार संघामध्ये विजयराव गाडे, विठलराव आरु, तेजराव वानखडे, प्रभाकर साबळे व उपसभापती भगवानराव बोरकर यांचा निसटता विजय झाला. केवळ एका मतांनी त्यांचा विजय झाला. अतिशय चुरशीच्या लढाईमध्ये सहकार विकास आघाडीच्या सुनामी लाटेमध्ये शिवराजा बळीराजा पॅनलचे उमेदवार डॉ. चंद्रशेखर देशमुख विजयी झाले तर तर माजी सभापती शामराव पाटील उगले यांचा ९ मतांनी पराभव झाला. सर्वाचे लक्ष लागलेल्या डॉ. धिरज देशमुख यांचा विजय सर्वांना आकर्षित ठरला आहे.