संतोष येलकर/अकोलानिवडणुकीस पात्र अशा राज्यातील सर्व सहकारी संस्थांच्या निवडणुका लवकरच राज्य सहकारी निवडणूक प्राधिकरणामार्फत घेण्यात येणार आहेत. त्यामध्ये अमरावती विभागातील अकोला, अमरावती व बुलडाणा या तीन जिल्ह्यातील निवडणुकीस पात्र ९५६ संस्थांच्या निवडणुकांचा समावेश आहे.विविध कारणांमुळे सन २0११-१२ पासून राज्यातील सहकारी संस्थांच्या निवडणुका घेण्यात आल्या नाही. त्यामुळे सद्यस्थितीत संचालक मंडळांच्या मुदती संपुष्टात येऊन, निवडणुकांसाठी पात्र असलेल्या सहकारी संस्थांची संख्या प्रत्येक जिल्ह्यात मोठी आहे. त्यानुषंगाने २0१३-१४ मध्ये निवडणुकीस पात्र असलेल्या राज्यातील सर्व सहकारी संस्थांच्या निवडणुका राज्य सहकारी निवडणूक प्राधिकरणामार्फत घेण्यात येणार आहेत. येत्या नोव्हेंबरपासून निवडणूक प्रकिया सुरु करण्यात येणार आहे. निवडणुकांसाठी सहकारी संस्थांच्या प्राथमिक मतदार याद्या अद्ययावत करण्याचे काम सुरु आहे. राज्यातील जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँका,नागरी सहकारी बँका, कर्मचारी नागरी पतसंस्था, सेवा सहकारी संस्था, औद्यागिक सहकारी संस्था, प्राथमिक शेती पतपुरवठा सहकारी संस्था, आद्योगिक प्रक्रिया सहकारी संस्था व इतर सहकारी संस्थांच्या निवडणुका नोव्हेंबरमध्ये राज्य सहकारी निवडणूक प्राधिकरणामार्फत प्रत्येक जिल्ह्यात जिल्हा उपनिबंधक कार्यालयाच्यावतीने घेण्यात येणार आहेत. निवडणुकीस पात्र तीन जिल्ह्यातील सहकारी संस्था!जिल्हा संस्थाअकोला ३५९वाशिम ३५0बुलडाणा २४७................................एकूण ९५६*प्राधिकरणामार्फत पहिल्यांदाच निवडणुका!सहकारी संस्थांच्या निवडणुका यापूर्वी जिल्हा उपनिबंधक कार्यालयांतर्गत यंत्रणेमार्फत घेण्यात येत होत्या. यावर्षीपासून मात्र राज्य सहकारी निवडणूक प्राधिकरणामार्फत सहकारी संस्थांच्या निवडणुका घेण्यात येत आहेत. त्यानुसार यावर्षी पहिल्यांदाच राज्यातील सहकारी संस्थांच्या निवडणुका राज्य सहकारी निवडणूक प्राधिकरणामार्फत घेण्यात येत आहेत. त्यामध्ये निवडणुकीसाठी प्राधिकरणामार्फत प्रत्येक जिल्ह्यात जिल्हा उपनिबंधकांना प्राधिकृत करण्यात आले आहे.
सहकारी संस्थांच्या निवडणुका लवकरच
By admin | Published: October 31, 2014 12:22 AM