लोकमत न्यूज नेटवर्कवाशिम: जिल्ह्यात सन २०१८-१९ मध्ये आंबिया बहारातील संत्रा, डाळिंब, आंबा व लिंबू या फळपिकांसाठी प्रधानमंत्री पीक विमा योजनेंतर्गत पुनर्रचित हवामान आधारित फळपिक विमा योजना राबविण्यात येत आहे. यापैकी संत्रा, डाळींब व लिंबू पिकासाठी किती शेतकºयांनी विमा उतरविला, याची माहिती कृषी विभागाकडून संकलीत केली जात आहे. बँकांकडून दिरंगाई होत असल्याने अद्याप माहितीचे संकलन होऊ शकले नाही, असे सूत्रांनी सांगितले.आंबिया बहारातील संत्रा फळपिकासाठी वाशिम तालुक्यातील पाच, रिसोड तालुक्यातील चार, मालेगाव तालुक्यातील सात, मंगरूळपीर तालुक्यातील सहा, मानोरा तालुक्यातील चार तसेच कारंजा तालुक्यातील सहा अशा महसूल मंडळांचा समावेश आहे. संत्रा पिकासाठी विमा योजनेत सहभागी होण्याची अंतिम मुदत ३० नोव्हेंबर होती.डाळींब या फळपिकासाठी वाशिम तालुक्यातील चार, मालेगाव तालुक्यातील एक, मंगरूळपीर तालुक्यातील सहा आणि मानोरा तालुक्यातील एका महसूल मंडळांचा समावेश होता. या योजनेत सहभागी होण्याची अंतिम मुदत ३१ आॅक्टोबर होती. आंबिया बहार लिंबूसाठी वाशिम तालुक्यातील एकमेव पार्डी टकमोर या महसूल मंडळाचा समावेश होता. लिंबू पिकासाठी योजनेत सहभागी होण्याची अंतिम मुदत १४ नोव्हेंबर होती. डाळींब तसेच लिंबू या पिकांसाठीची मुदत संपून १५ पेक्षा अधिक दिवसांचा कालावधी संपला आहे. तथापि, बँकांकडून माहिती येण्यास विलंब होत असल्याने अद्याप माहितीचे संकलन झाले नाही, असे कृषी विभागाने स्पष्ट केले. आंबा पिकासाठी ३१ डिसेंबर अंतिम मुदतआंबा या पिकाकरीता वाशिम तालुक्यातील केकतउमरा, राजगाव, मानोरा तालुक्यातील मानोरा या महसूल मंडळांचा समवेश विमा योजनेत करण्यात आला आहे. आंबा पिकासाठी प्रति हेक्टर १ लाख २१ हजार रुपये विमा संरक्षण मिळणार असून याकरिता ६ हजार ५० रुपये विमा हप्ता शेतकºयांनी भरावयाचा आहे. आंबा पिकासाठी योजनेत सहभागी होण्याची अंतिम मुदत ३१ डिसेंबर २०१८ पर्यंत आहे.
फळपीक विमाधारकांच्या माहितीचे संकलन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 03, 2018 2:54 PM