लोकमत न्यूज नेटवर्कवाशिम : उन्हाळ्याच्या दिवसांत जलस्त्रोतांची पातळी खालावल्याने पाण्यात आरोग्यास हानीकारक घटक वाढतात. या पृष्ठभुमीवर जिल्हा प्रशासनाने जिल्हाभरातील पिण्याच्या जलस्त्रोताचे नमुने संकलित करण्यात येत आहेत. या अंतर्गत १३ मार्चपर्यंत जिल्हाभरातील जलस्त्रोतांतून २२६२ नमुने संकलित करण्यात आले आहेत. यापैकी तपासण्यात आलेल्या नमुन्यांपैकी दुषित नमुन्यांची माहिती संबंधित यंत्रणेला तात्काळ त्याची माहिती देऊन उपाय योजनांच्या सुचना देण्यात येत आहेत.उन्हाळ्याच्या दिवसांत खालावणारी भुजल पातळी लक्षात घेता भुजल सर्वेक्षण व विकास यंत्रणा, तसेच जिल्हा परिषदेच्या पाणी गुणवत्ता संनियंत्रण व सर्वेक्षण कार्यक्रमांतर्गत जिल्हाभरातील पिण्याच्या जलस्त्रोतांतील नमुन्यांचे संकलन करण्यास प्रारंभ करण्यात आला आहे. या कार्यक्रमांतर्गत जिओ फे न्सिंग मोबाईल अॅपचा वापर करून २०६४, तर नॉन जिओ फेन्सिंग पद्धतीने १९८ नमुन्यांचे संकलन करण्यात आले. हे नमुने जिल्हा प्रयोगशाळेसह मानोरा आणि मालेगाव येथील उपविभागीय प्रयोगशाळेत तपासणीसाठी पाठविण्यात आले.यात जिल्हा प्रयोग शाळेत २९६, मालेगाव येथील उपविभागीय प्रयोगशाळेत ३९७, तर मानोरा येथील उपविभागीय प्रयोगशाळेत १५६९ नमुन्यांची तपासणी करण्यात आली आहे.जिल्हाभरातील पिण्याच्या जलस्त्रोतांचे नमुने संकलित करून त्याची तपासणी करण्यात आल्यानंतच जिल्हाभरातील किती जलस्त्रोतांतील नमुने दुषित आणि पिण्यासाठी अयोग्य आहे, ते स्पष्ट होऊ शकणार आहे.
जिल्हाभरातून संकलित करण्यात येत असलेल्या पाणी नमुन्यांची तपासणी प्रयोगशाळांत केली जात आहे. तपासण्यात आलेले पाणी नमुने अयोग्य असल्यास त्वरित ग्रामपंचायत, जिल्हा आरोग्य अधिकारी,गट विकास अधिकारी यांना त्वरित त्याच दिवशी कळविण्यात येते. त्यांचे मार्फत गावांना कळविण्साठी पुढील कार्यवाही होते.- सुनील कडूवरिष्ठ भुवैज्ञानिक,भुजल सर्वेक्षण व विकास यंत्रणा, वाशिम