फायर ऑडिट व स्ट्रक्चरल ऑडिटच्या अनुषंगाने ३ मे रोजी आयोजित खासगी डॉक्टरांच्या सभेत ते बोलत होते. यावेळी निवासी उपजिल्हाधिकारी शैलेश हिंगे, नगरपालिका प्रशासन अधिकारी तथा वाशिम नगर परिषदेचे मुख्याधिकारी दीपक मोरे यांची प्रमुख उपस्थिती होती. जिल्हाधिकारी शण्मुगराजन एस. म्हणाले, ज्या रुग्णालयांचे फायर ऑडिट व स्ट्रक्चरल ऑडिट झाले नाही, त्यांनी दोन्ही ऑडिट करून घेण्याची कार्यवाही युद्धपातळीवर करावी. खासगी कोविड हेल्थ सेंटर व कोविड रुग्णालय सुरू असलेल्या इमारतींच्या फायर ऑडिट व स्ट्रक्चरल ऑडिटला प्राधान्य द्यावे. हे ऑडिट पूर्ण होताच याबाबतचा अहवाल तातडीने जिल्हाधिकारी कार्यालयास सादर करावा. येत्या दोन ते तीन दिवसांत सदर ऑडिट कोणत्याही परिस्थितीत पूर्ण करावे, अशा सूचना जिल्हाधिकाऱ्यांनी यावेळी दिल्या.
जिल्हाधिकाऱ्यांनी घेतला रुग्णालयांच्या फायर ऑडिटचा आढावा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 05, 2021 5:07 AM