कोठारी येथील निर्मला भगत यांना परितक्त्या म्हणून अनुदान सुरू होते; परंतु गेल्या काही महिन्यांपासून त्यांना अनुदान मिळालेले नाही. म्हणून संजय गांधी योजना विभागात चौकशी केली असता, तेथील लिपिकाने दोन हजार रुपये दिल्याशिवाय अनुदान सुरू होणार नाही, असे सांगून शाब्दीक अपमान केला, असे तक्रारीत नमूद आहे. अनुदान नसल्याने लहान मुलांचा उदरनिर्वाह करणे सध्या कठीण झाले आहे. त्यामुळे लिपिकावर कार्यवाही करून अनुदान तत्काळ सुरू करावे, अशी मागणी करण्यात आली होती. यावर जिल्हाधिकारी यांनी तहसीलदार यांना पत्र देऊन याबाबत आपल्या स्तरावरून कारवाई करून त्याचा अहवाल सादर करण्याचे आदेश दिले आहेत.
बॉक्स
महिलांनी मुद्रांकावर दिले शपथपत्र
याबाबत तक्रारकर्त्या महिलेने १९ एप्रिल रोजी सदरची तक्रार शंभर रुपयांच्या मुद्रांकावर देत तक्रार खरी असल्याचे शपथपत्र दिले आहे, तर अन्य एका महिलेनेसुद्धा असेच शपथपत्र दिले असून, त्यामध्ये लिपिक शिंदे यांनी पैशाची मागणी केल्याचे म्हटले आहे.