वाशिम: अनुसूचित जमातीच्या विद्यार्थ्यांच्या शिष्यवृत्तीचे प्रस्ताव एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प कार्यालयाकडे पाठविण्याबाबत महाविद्यालयांची उदासीनता दिसून येत आहे. या गंभीर बाबीची दखल एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प अधिकारी अकोला यांनी घेतली असून, सर्व शासकीय, निमशासकीय, अनुदानित आणि कायम विना अनुदानित महाविद्यालयांनी शिष्यवृत्तीचे प्रलंबित प्रस्ताव तात्काळ सादर करण्याचे आवाहन त्यांनी केले आहे. प्रकल्प अधिकारी एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प अकोला अंतर्गत असलेल्या वाशिम जिल्ह्यातील सर्व शासकीय, निमशासकीय, अनुदानीत, कायम विना अनुदानीत महाविद्यालयातील अनुसूचित जमातीच्या विद्यार्थ्यांना भारत सरकार कडून दिल्या जाणाºया शिष्यवृत्तीचे प्रस्ताव पाठविण्यासाठी प्रकल्प अधिकारी कार्यालयाकडून वारंवार भेटी देवून आणि पाठपुरावा करुनही काही महाविद्यालयांनी सदर प्रस्ताव प्रकल्प कार्यालयास सादर केलेले नाहीत, त्यामुळे अनुसूचित जमातीचे विद्यार्थी शिष्यवृत्तीपासून वंचित राहण्याची शक्यता नाकारता येत नाही. तथापी शिष्यवृत्ती प्रस्ताव तात्काळ या कार्यालयास सादर न केल्यास अनुसूचित जमातीच्या विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक व आर्थिक नुकसानाकरीता महाविद्यालय जबाबदार राहील याची संबंधित महाविद्यालयांनी नोंद घ्यावी, असे प्रकल्प अधिकारी एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प, अकोला यांनी सांगितलेआहे.
शिष्यवृत्तीच्या प्रस्तावांबाबत महाविद्यालयांची उदासीनता
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 19, 2018 4:44 PM
वाशिम: अनुसूचित जमातीच्या विद्यार्थ्यांच्या शिष्यवृत्तीचे प्रस्ताव एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प कार्यालयाकडे पाठविण्याबाबत महाविद्यालयांची उदासीनता दिसून येत आहे.
ठळक मुद्देगंभीर बाबीची दखल एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प अधिकारी अकोला यांनी घेतली.वारंवार भेटी देवून आणि पाठपुरावा करुनही काही महाविद्यालयांनी सदर प्रस्ताव प्रकल्प कार्यालयास सादर केलेले नाहीत.