लोकमत न्यूज नेटवर्क वाशिम: मतदार याद्यांचा विशेष संक्षिप्त पुनरीक्षण कार्यक्रमांतर्गत जिल्ह्यात ३७ हजार ४३४ नवीन मतदारांची नोंदणी करण्यात आली असून, १३७५ मयत किंवा स्थलांतरीत मतदारांची नावे वगळण्यात आली आहेत. निवडणूक विभागाकडून आता रंगीत मतदान ओळख पत्र प्रकाशित करण्यात आले आहेत. यानुसार जिल्ह्यात पहिल्या टप्प्यात प्राप्त झालेल्या ओळखपत्रांचे मतदारांना वितरणही करण्यात आले आहे. निवडणूक आयोगाच्या निदेर्शाप्रमाणे १ जानेवारी २०१९ या अर्हता दिनांकावर आधारित मतदार याद्यांचा विशेष संक्षिप्त पुनरीक्षण कार्यक्रमांतर्गत जिल्ह्यात १ सप्टेंबर ते ३१ आॅक्टोबर या कालावधीत मतदार नोंदणीची मोहीम राबविण्यात आली. या मोहिमेत वयाची १८ वर्षे पूर्ण झालेल्या नवीन मतदारांची नावे मतदार यादीत समाविष्ट करणे, मतदारांच्या नावात बदल, पत्त्यात दुरुस्ती, स्थलांतरासंबंधी मतदारांकडून नमुना अर्ज भरून घेणे तसेच मयत मतदारांची नावे यादीतून वगळण्याचे काम करण्यात आले. वयाची १८ वर्षे पूर्ण झालेल्या नवीन मतदारांची नावे मतदार यादीत नोंदविण्यासाठी मतदारांकडून नमुना क्र.६ चा अर्ज भरून घेण्यात आला. मतदार नोंदणी मोहिमेत जिल्ह्यातील वाशिम - मंगरुळपीर, रिसोड -मालेगाव आणि कारंजा -मानोरा या तिन्ही विधानसभा मतदारसंघात १ सप्टेंबर ते ३१ आॅक्टोबर या कालावधीत ३७ हजार ४३४ नवीन मतदारांची नोंदणी करण्यात आली आहे. नवीन मतदारांची नावे मतदार यादीत समाविष्ट करण्यात आल्यानंतर आता या मतदारांच्या ओळखपत्रांची छपाई राज्यस्तरावर करण्यात आली असून, जिल्ह्यात पहिल्या टप्प्यात प्राप्त झालेल्या मतदान ओळखपत्रांचे वितरण नवमतदारांना करण्यात आले आहे.
मतदारसंघनिहाय अशी आहे नवीन मतदारांची नोंदणी!मतदारसंघ मतदारवाशिम - मंगरूळपीर १२, ४७४रिसोड - मालेगाव ११, ६७०कारंजा -मानोरा १३,२९०....................................................................जिल्हयात ३७४३४ नवे मतदार