लोकमत न्यूज नेटवर्कवाशिम : जिल्ह्यात आतापर्यंत ९६ कोरोनाबाधित रुग्ण आढळले असून, यापैकी दोघांचा मृत्यू झाला. आतापर्यंत ६४ जणांनी कोरोनावर मात केली असून, रुग्ण बरे होण्याच्या प्रमाणात वाढ होत असल्याचे दिसून येते. २१ ते २६ जून या सहा दिवसाच्या कालावधीत तब्बल ४५ जणांनी कोरोनावर मात केली. उर्वरीत ३० जणांवर उपचार सुरू असून, सर्वांची प्रकृती स्थिर आहे. ३० पैकी १४ जणांमध्ये तर कोरोनाची लक्षणेही दिसून येत नाहीत, असे आरोग्य विभागाने स्पष्ट केले.जिल्ह्यात एप्रिल महिन्यात पहिला कोरोनाबाधित रुग्ण मेडशी (ता. मालेगाव) येथे आढळून आला होता. मे महिन्यापर्यंत रुग्णसंख्या आटोक्यात होती. जून महिन्यात रुग्ण संख्या वाढत असण्याबरोबरच रुग्ण बरे होण्याचे प्रमाणही वाढत असल्याचे दिसून येते. ९६ पैकी आतापर्यंत ६४ जणांनी कोरोनावर मात केली. अलिकडच्या काळात अर्थात २१ ते २६ जून या सहा दिवसात ४५ जणांनी कोरोनावर मात केली. २१ जून रोजी ६, २२ जून रोजी १६, २३ जून रोजी ७, २४ जून रोजी ४, २५ जून रोजी ६, २६ जून ६ असा कोरोनामुक्त झालेल्या नागरिकांचा आकडा आहे. ३० रुग्णांवर उपचार सुरू असून, यातील १४ रुग्णांमध्ये कोरोनाची लक्षणेही दिसून येत नाहीत.
१२४१ नमुन्यांपैकी १०९८ नमुने निगेटिव्ह !संदिग्ध रुग्णांचे थ्रोट स्वॅब नमुने घेण्याची सुविधा सुरूवातीला जिल्हास्तरावरच उपलब्ध होती. त्यामुळे नमुने घेणे आणि तपासणीसाठी पाठविणे याला विलंब होत होता. महिन्याभरापूर्वी प्रत्येक तालुकास्तरावरच थ्रोट स्वॅब नमुने घेण्याची सुविधा उपलब्ध करण्यात आली. बाहेरगावावरून आलेल्या नागरिकांची आरोग्य केल्यानंतर, ज्यांना सर्दी, ताप, खोकला किंवा सारीची लक्षणे आढळून येतात, अशा नागरिकांचे थ्रोट स्वॅब नमुने तपासणीसाठी पाठविण्यात येत आहेत. खबरदारी म्हणून आता सर्दी, ताप, खोकला, बाहेरगावावरून परतलेल्या गर्भवती महिलांचेही स्वॅब घेतले जात आहेत. आरोग्य विभागाच्यावतीने आतापर्यंत एकूण १२४१ जणांचे थ्रोट स्वॅब नमुने तपासणीसाठी पाठविण्यात आले आहेत. यापैकी १०९८ नमुने निगेटिव्ह आले असून, ९४ नमुने पॉर्झििटव्ह आले तर ४९ जणांच्या नमुन्याचा अहवाल प्रतिक्षेत आहे.