झाली होती. त्यामुळे शेतकऱ्यांना पावसाळ्यात अनेक अडचणींचा सामना करावा लागत होता. ही समस्या दूर करण्याची मागणी शेतकऱ्यांकडून प्रशासनाकडे निवेदनाद्वारे करण्यात आली होती. त्याची दखल घेण्यात आली असून, पालकमंत्री योजनेंतर्गत आमदार निधीतून या रस्त्याच्या कामाला शनिवारपासूनच सुरुवात करण्यात आली आहे.
काजळेश्वर-उजळेश्वर पांदण रस्त्याची अवस्था अत्यंत वाईट झाल्याने पावसाळ्यात या रस्त्यावर दलदलसदृश स्थिती होऊन शेतकऱ्याची वाटच बंद होत असे. वहिवाट बंद पडल्याने शेतीच्या कामावर परिणाम होऊन उत्पादनात घटही येत होती. अनेकदा, तर शेतकऱ्यांना तयारी करून वेळेत पेरणी करणे, पिकांत वाढलेले तण काढणे, खत टाकणे अशक्य होत असे. शिवाय शेती कामासाठी विविध साहित्य घेऊन जाणेही अशक्य होत असे. लोकमतने या रस्त्याच्या अवस्थेबाबत वृत्त प्रकाशित करून शेतकऱ्यांच्या समस्येकडे प्रशासनाचे वारंवार लक्ष वेधले, तर जि.प. सदस्य अशोक डोंगरदिवे, पं.स. सदस्य रंगराव धुर्वे यांनीही कारंजा तहसीलदार धीरज मांजरे यांचेकडे शेतकऱ्यांची समस्या मांडून रस्त्याचे काम करण्याची मागणी केली होती . त्याची दखल आता घेण्यात आली असून, पालकमंत्री पाणंद रस्ते योजनेतून या रस्त्याच्या कामाला आमदार निधीमधून शनिवारी सुरुवात करण्यात आली आहे. यावेळी काजळेश्वर सर्कलचे जि.प. सदस्य अशोकराव डोंगरदिवे. पं.स. सदस्य रंगराव धुर्वे. ज्येष्ठ शेतकरी
दिगांबर उपाध्ये, नंदू उपाध्ये, संदीप उपाध्ये, राजू उपाध्ये, तन्नू पठाण, प्रशांत उपाध्ये, गणेश उपाध्ये यांच्यासह शेतकरी उपस्थित होते. रस्त्याच्या कामाला सुरुवात झाल्याने शेतकरीवर्गात आनंदाचे वातावरण आहे.
---------
कोट : पाणंद रस्ते या शेतीच्या रक्तवाहिन्या आहेत. त्यामुळे शेती वहिवाटीसाठी पाणंद रस्ते करण्यास व शेतकऱ्यांच्या समस्या सोडविण्यासाठी प्रशासनाचा प्राधान्यक्रम आहे
-धीरज मांजरे, तहसीलदार कारंजा