वाशिम : जिल्ह्यात शेतमाल तारण कर्ज योजनेतून सन २०१९ या वर्षात ६१४ शेतकºयांना ६ कोटी ६४ लाख ७२ हजार रुपये कर्ज पुरविण्यात आले आहे.शेतमालाच्या काढणी हंगामात उतरत्या बाजार भावामुळे शेतकºयांचे आर्थिक नुकसान होत असते. हे आर्थिक नुकसान टाळून त्यांना सुलभ कर्ज उपलब्ध करून देण्यासाठी महाराष्ट्र राज्य कृषि पणन मंडळ, शेतकºयांसाठी राज्यातील बाजार समित्यांचे माध्यमातून शेतमाल तारण कर्ज योजना राबविते. हंगाम कालावधीत शेतकºयास असलेली आर्थिक निकड विचारात घेऊन, त्यांना गरजेच्या वेळी सुलभ व त्वरित कर्ज उपलब्ध करून देणे हा शेतमाल तारण कर्ज योजनेचा मुख्य उद्देश आहे. या योजनेअंतर्गत शेतकºयांना बाजार समिती अथवा वखार महामंडळाच्या गोदामात ठेवलेल्या शेतमालाच्या एकूण किंमतीच्या ७५ टक्के पर्यंत रक्कम सहा महिने कालावधीसाठी सहा टक्के व्याज दराने तारण कर्ज म्हणून देण्यात येते.शेतकºयांच्या शेतमालास योग्य बाजारभाव मिळावा, या दृष्टिकोनातून राबविण्यात येत असलेली शेतमाल तारण कर्ज योजना जिल्ह्यात राबविली जात असून, शेतकºयांना प्रोत्साहित केले जाते. शेतमाल तारण कर्ज योजनेमध्ये तूर, मूग, उडीद, सोयाबीन, सुर्यफूल, चना, भात (धान), करडई, ज्वारी, बाजरी, मका, गहू, काजू बी, बेदाणा, हळद आदी शेतमालाचा समावेश आहे. जिल्ह्यात सन २०१९ या वर्षात ६१४ शेतकºयांना ६ कोटी ६४ लाख ७२ हजार रुपयांचे कर्ज पुरविण्यात आले आहे.
शेतमाल तारण कर्ज योजना : ६१४ शेतकऱ्यांना ६.६४ कोटींचे कर्ज वाटप!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 25, 2019 4:37 PM