११ जून रोजी होणाऱ्या मार्गदर्शन सत्रात पुणे येथील ज्ञानदीप अकॅडमीचे संचालक महेश शिंदे, चंद्रपूरचे सहायक जिल्हाधिकारी रोहन घुगे (भा.प्र.से.), उपजिल्हाधिकारी गौरव इंगोले मार्गदर्शन करणार आहेत. युवक-युवतींसाठी वर्षभर प्रत्येक आठवड्यामध्ये दर शुक्रवारी दुपारी ३ ते ४ वाजेपर्यंत एकूण ५२ मार्गदर्शन व समुपदेशन सत्रांचे आयोजन केलेले आहे. यामध्ये तज्ज्ञ मार्गदर्शकांशी संवाद साधण्यात येणार असून त्याद्वारे उमेदवारांना रोजगार व स्वयंरोजगार विषयक मार्गदर्शन, करिअर मार्गदर्शन, दहावी-बारावीनंतरच्या संधी, इतर विविध क्षेत्रांसंबंधी माहितीविषयी मार्गदर्शन व समुपदेशन करण्यात येणार आहे. तसेच प्रत्येक महिन्याच्या दुसऱ्या मंगळवारी दुपारी ३ ते ४.३० वाजेपर्यंत विविध प्रकारच्या स्पर्धा परीक्षांकरिता एकूण १२ व प्रत्येक महिन्याच्या चौथ्या मंगळवारी ३ ते ४.३० वाजेपर्यंत उद्योजकता विषयक एकूण १२ असे वर्षभरामध्ये एकूण ७६ ऑनलाईन मोफत मार्गदर्शन व समुपदेशन सत्रांचे आयोजन करण्यात येणार आहे.
वेबिनारद्वारे स्पर्धा परीक्षेसंबंधी मार्गदर्शन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 10, 2021 4:27 AM