द्रुतगती मार्गाची दयनीय अवस्था झाली होती. त्यामुळे सध्या या रस्त्याची डागडुजी आणि दुरुस्तीचे काम सुरू आहे. सदर कामाची शेलूबाजार येथे पांडुरंग कोठाळे, किशोर देशमुख, राजू भोसले, सूरज हांडे, संतोष लांभाडे, सतीश सावके, शरद कांबे, दिवाकर चक्रनारायण यांनी घटनास्थळाची पाहणी केली असता, काम निकृष्ट दर्जाचे होत असल्याचे दिसून आले. याबाबत या विभागाचे उपविभागीय अभियंता कसबे आणि कार्यकारी अभियंता पाटील यांना कामाच्या ठिकाणी बोलावून परिस्थिती लक्षात आणून दिली. यावेळी त्यांनी कंपनीचे प्रोजेक्ट मॅनेजर जवादे यांना कामाच्या दर्जासंदर्भाने सूचना देऊन काम सुरू करण्यात आले. येणाऱ्या काळात काम चालू असताना पुन्हा असा प्रकार झाल्यास काम पुन्हा बंद करू, असा इशारा सामाजिक कार्यकर्ते पांडुरंग कोठाळे यांनी दिला.
द्रुतगती मार्गाच्या कामाबाबत तक्रार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 07, 2021 4:43 AM