लोकमत न्यूज नेटवर्करिसोड (वाशिम ) : तालुक्यातील जवळा येथे ग्रामपंचायत निवडणुकीच्या आचारसंहितेत गावातील काही जणांनी सरकारी रस्त्यावर कमान उभारणीचे काम सुरू केले आहे. यासंदर्भात विश्वास रामभाऊ राठोड यांनी रिसोड तहसिलदारांकडे शनिवारी निवेदनाद्वारे तक्रार केली. त्या अनुषंगाने तहसीलदार राजेश सुरडकर यांनी चौकशी करण्याचे आदेश गटविकास अधिकाºयांना सोमवारी दिले.विश्वास राठोड यांनी तक्रारीत नमूद केले की, जवळा येथे ग्रामपंचायत निवडणूक आहे. गावातील काही जणांनी गावात प्रवेश होण्याच्या ठिकाणी सरकारी जागेवर कमान उभारणीचे काम सुरू केले आहे. या बांधकामासाठी कोणतीही परवानगी घेण्यात आली नसल्याचे तक्रारीत म्हटले आहे. याप्रकरणी आचारसंहितेचा भंग होत असून, संबंधितांविरूद्ध कारवाई करण्याची मागणी विश्वास राठोड यांनी निवेदनाद्वारे केली. या निवेदनाची दखल घेत तहसिलदार सुरडकर यांनी गटविकास अधिकाºयांना चौकशीचे आदेश दिले आहेत.
‘कमान’ उभारणीच्या कामाची तक्रार !
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 18, 2017 7:12 PM
तालुक्यातील जवळा येथे ग्रामपंचायत निवडणुकीच्या आचारसंहितेत गावातील काही जणांनी सरकारी रस्त्यावर कमान उभारणीचे काम सुरू केले आहे. यासंदर्भात विश्वास रामभाऊ राठोड यांनी रिसोड तहसिलदारांकडे शनिवारी निवेदनाद्वारे तक्रार केली. त्या अनुषंगाने तहसीलदार राजेश सुरडकर यांनी चौकशी करण्याचे आदेश गटविकास अधिकाºयांना सोमवारी दिले.
ठळक मुद्देजवळा येथील प्रकरणचौकशीचे आदेश