मोरगव्हाण ग्रामपंचायत समोरील गावातील मुख्य मार्गावर गटार साचले आहे. या गटारामधूनच ग्रामस्थांना दररोज ये-जा करावी लागत आहे. गावातील बळीराम कोकाटे तर वाडी येथील श्याम गंगावणे यांच्या घरासमोरील सुमारे सहा लाख रुपयांचे दोन सिमेंट काँक्रीटचे रस्ता करण्यात आले आहेत, परंतु सदर रस्ता कामामध्ये वाळूऐवजी भुश्याचा वापर करीत मोठ्या प्रमाणात कंत्राटदार व ग्रामपंचायत यांनी संगणमतांनी भ्रष्टाचार केला आहे. सदर कामाची सखोल चौकशीची मागणी ग्रामपंचायत सदस्य एकनाथ पाटील काळे यांनी पंचायत समितीकडे केली आहे. ग्रामसेवक फकिरा थोरात यांचा दूरध्वनी सतत बंद आसल्याने ग्रामस्थांचा संताप अनावर झाला आहे. गावातील हनुमान मंदिराला लागून सार्वजनिक स्वयंपाकगृहाजवळ रस्तावरून घाण पाणी वाहत असल्याने ग्रामस्थांचे आरोग्य धोक्यात आलेले आहे. संबंधित बाबीकडे लक्ष देण्याची व विकासकामातील भ्रष्टाचाराची सखोल चौकशीची मागणी एकनाथ दत्ता काळे यांनी केली आहे. मोरगव्हाणवाडी गट ग्रामपंचायत अंतर्गत बोगस कामा संदर्भात अधिक माहितीकरिता ग्रामसेवक फकिरा थोरात यांच्याशी संपर्क करण्याचा प्रयत्न केला आसता त्यांचा दूरध्वनी बंद होता.
रस्त्याचे काम नियमानुसार केल्या जात नसल्याची तक्रार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 24, 2021 4:39 AM