लोकमत न्यूज नेटवर्कवाशिम: जिल्ह्यात अवकाळी पावसाची रिपरिप कायमच असल्याने पीक नुकसानाची पाहणी करण्यात अडथळे येत आहेत. पीक विमा भरणाऱ्या शेतकऱ्यांच्या ८६ हजार ४३ शेतकºयांच्या पीक नुकसानाच्या तक्रारी प्रशासनाकडे प्राप्त झाल्या आहेत. त्यात आता पीक न भरणाºया शेतकºयांच्या नुकसानाची पाहणी करण्याचे निर्देशही शासनाने दिले असल्याने पीक पाहणी तातडीने करण्यासाठी प्रशासनाची धांदलघाई सुरु झाली आहे.वाशिम जिल्ह्यात गत १५ दिवसांपासून अवकाळी पावसाने ठाण मांडले आहे. त्यात २७ आॅक्टोबरपासून या पावसाने कहरच केला. त्यामुळे जिल्ह्यात सोयाबीन, तूर, कपाशी या उभ्या खरीप पिकांसह पपई, संत्रा, लिंबू, डाळींब आणि इतर फळपिकांचे नुकसान झालेच शिवाय हजारो शेतकºयांचे काढणीपश्चात सोयाबीनचेही अतोनात नुकसान झाले. या पीक नुकसानापोटी शेतकºयांना आर्थिक मदत करण्यासाठी पीकविमा भरणाºया शेतकºयांना पीक विमा कंपनीच्या प्रतिनिधीसह तालुका कृषी अधिकारी कार्यालयाकडे अर्ज करण्याचे आवाहन जिल्हा प्रशासनाने केले. ही तक्रार ४८ तासांत करावी लागणार असल्याने शेतकºयांनी संबंधित केंद्रांवर मोठी गर्दी केली आणि जिल्ह्यातील सहाही तालुक्यांत मिळून गुरुवार ३१ आॅक्टोबरपर्यंत सायंकाळी ६ वाजेपर्यंत एकूण ८६ हजार ४३ शेतकºयांनी पीक नुकसानाच्या तक्रारी प्रशासनाकडे सादर केल्या आहेत.दरम्यान, प्रशासनाने मंगळवारपासून पीक पाहणीचा कार्यक्रमही सुरू केला; परंतु पावसाची रिपरिप सुरू असल्याने या पीक पाहणीतही अडथळे येत आहेत. त्यात आता सर्वच मंडळातील पीक विमा भरणाºया शेतकºयांसह पीक विमा योजनेत सहभाग न घेतलेल्या शेतकºयांच्या पीक नुकसानाची पाहणी करण्याचे निर्देश शासनाने दिले असल्याने प्रशासनाची पीक पाहणीसाठी धांदलघाई सुरू झाली आहे. जिल्ह्यात सर्वदूर अवकाळी पावसाचा जोरदार तडाखागेल्या काही दिवसांत जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात अवकाळी पाऊस झाला. त्यात २८ आॅक्टोबर रोजी सकाळी ८ वाजता संपणाºया २४ तासांत एकाच दिवशी वाशिम तालुक्यात ४९.०३ मि.मी., मालेगाव तालुक्यात ३९.१३ मि. मी., रिसोड तालुक्यात २५.८८ मि. मी., मंगरुळपीर तालुक्यात ३१.०० मि. मी., मानोरा तालुक्यात २१.७५ मि. मी. आणि कारंजा तालुक्यात २४.२५ मि. मी. पावसाची नोंद झाली आहे. या अवकाळी पावसामुळे खरीप हंगामातील उभी पिके व कापणी झालेल्या पिकांचे नुकसान झाले आहे.
३३ टक्के किंवा त्यापेक्षा अधिक नुकसानाचे जिल्ह्यातील सर्व महसूली मंडळातील पंचनामेजिल्ह्यात अवेळी आलेल्या पावसामुळे खरीप पिकांचे नुकसान झाले आहे. ३३ टक्के किंवा त्यापेक्षा अधिक नुकसान झालेल्या पिकांचे पंचनामे तातडीने करण्याचे आदेश शासनाने दिले आहेत. त्यानुसार तलाठी, कृषि सहाय्यक व ग्रामविकास अधिकारी यांनी संयुक्त पंचनामे करण्याची कार्यवाही तातडीने करण्याचे आदेश जिल्हाधिकाºयांनी दिले आहेत. जिल्ह्यातील अतिवृष्टी झालेल्या महसूल मंडळांसह सर्वच महसूल मंडळात हे पंचनामे होणार आहेत, असे जिल्हा प्रशासनाने कळविले आहे. त्यानुसार तलाठी, कृषि सहाय्यक व ग्रामविकास अधिकारी यांनी पंचनाम्यास सुरुवात केली आहे. नुकसानग्रस्त शेतकºयांनी आपल्या पिकांच्या नुकसानाचे पंचनामे न झाल्यास याबाबतची माहिती तलाठी, कृषि सहाय्यक, मंडळ कृषि अधिकारी, तालुका कृषि अधिकारी किंवा तहसीलदार यांना कळवावी, असे आवाहन जिल्हा प्रशासनाने केले आहे.
७७५ शेतकºयांच्या नुकसानाचे पंचनामेशासनाच्या निर्देशानुसार कृषी विभागासह पीकविमा कंपनीने अवकाळी पावसामुळे झालेल्या पीक नुकसानाचे पंचनामे वेगाने सुरू केले असून, ३१ आॅक्टोबरपर्यंत ७७५ शेतकºयांच्या शेताचे पंचनामेही पूर्ण करण्यात आले आहेत. त्यात वाशिम तालुक्यातील १२०, रिसोड तालुक्यातील ११५, मालेगाव तालुक्यातील ७०, मंगरुळपीर तालुक्यातील २५०, मानोरा तालुक्यातील १०० आणि कारंजा तालुक्यातील १२० शेतकºयांच्या नुकसानाच्या पंचनाम्याचा समावेश आहे.