शहरं
Join us  
Trending Stories
1
Ratan Tata News Live: रतन टाटांचे पार्थिव वरळीच्या स्मशानभूमीत दाखल, थोड्या वेळात अंत्यसंस्कार
2
"या नेत्यांमुळे काँग्रेस हरयाणात हरली’’, पराभवाचं खापर फोडत संतप्त राहुल गांधींनी मांडलं परखड मत 
3
उद्धव ठाकरेंसोबतच्या बैठकीत काय चर्चा झाली?; रविकांत तुपकरांनी सांगितली रणनीती
4
कमाल! २ वेळा अपयश आलं, निराश झाली पण हरली नाही...; IPS अधिकारी होण्याचं स्वप्न केलं पूर्ण
5
मदरश्यांमधील शिक्षकांच्या मानधनात वाढ, खासगी विद्यापीठांना मंजुरी, राज्य मंत्रिमंडळात निर्णयांचा धडाका
6
Video: चेंडू हवेत जाताच हार्दिक पांड्या तुफान धावत सुटला, एका हाताने टिपला भन्नाट कॅच
7
सणासुदीच्या काळात मोदी सरकारची राज्यांना मोठी भेट, 1.78 लाख कोटी रुपये जारी...
8
"रतन टाटांसारख्या व्यक्तीला खरं तर हयात असतानाच 'भारतरत्न'ने सन्मानित करायला हवं होतं"
9
"या पराभवाला खूप गंभीरपणे..."; हरयाणा विधानसभा निकालावर अशोक गेहलोत यांचं मोठं विधान
10
२० वर्षांपासून असलेल्या नोकराने घात केला; भाजपा मंत्र्याच्या ५० लाखांच्या दागिन्यांवर डल्ला मारला
11
आळंदीची लेक ते महाराष्ट्राची लोकप्रिय गायिका; जीवनातील अध्यात्माचं महत्त्व, महिला सुरक्षेवरही कार्तिकी स्पष्टच बोलली..
12
PAK vs ENG : मुल्तानमध्ये इंग्लंड 'सुल्तान'! ऐतिहासिक आकडा अन् विश्वविक्रम; भारताचा विक्रम मोडला
13
रिस्क घ्यायची नसेल तर 'या' सरकारी स्कीममध्ये गुंतवा पैसा; रिटायरमेंटपर्यंत व्हाल २,२६,९७,८५७ रुपयांचे मालक
14
इंग्लंड-पाक नव्हे भारत-श्रीलंका लढतीत सेट झालाय कसोटीतील सर्वोच्च धावसंख्येचा वर्ल्ड रेकॉर्ड
15
रतन टाटांसह त्यांच्या भावानेही लग्न केले नाही; सावत्र भाऊ सांभाळतो व्यवसाय, कुटुंबात कोण..?
16
Dussehra 2024: दसर्‍याला आठवणीने करा 'हे' एक काम; वास्तुमध्ये सदैव राहील सुख, संपत्ती, समाधान!
17
PAK vs ENG Live : इंग्लंड ७ बाद ८२३! पाकिस्तानी चाहत्यांना वेदना देणारी 'कसोटी', हॅरी ब्रूकच्या ३१७ धावा
18
एक पंखा, दोन बल्ब आणि टीव्ही..., विजेचं बिल आलं १.९ लाख रुपये, त्रस्त युवकानं उचललं टोकाचं पाऊल  
19
टाटांची जादू : टाटांच्या 'या' शेअरनं १ लाखांचे केले ₹३५ कोटी; गुंतवणूकदार झाले कोट्यधीश
20
सर्वाधिक १० श्रीमंत उमेदवारांमध्ये ७ पुरुष, ३ महिला; सर्व पुरुष हरले, महिला जिंकल्या

सहस्त्र सिंचन विहिर योजनेला तक्रारींचे ग्रहण  

By admin | Published: March 30, 2017 1:56 PM

जिल्ह्यातील शेतकºयांना सिंचन सुविधा उपलब्ध करण्यासाठी राबविण्यात येत असलेल्या सहस्त्र सिंचन विहिर योजनेला तक्रारींचे ग्रहण लागले आहे.

वाशिम: जिल्ह्यातील शेतकऱ्यांना सिंचन सुविधा उपलब्ध करण्यासाठी राबविण्यात येत असलेल्या सहस्त्र सिंचन विहिर योजनेला तक्रारींचे ग्रहण लागले आहे. लाभार्थींची निवड करण्यासाठी आयोजित ग्रामसभेपासून ते थेट जिल्हाधिकाऱ्यांपर्यंत या योजनेबाबत विविध प्रकारच्या शेकडोवर तक्रारी करण्यात आल्या आहेत. जिल्ह्यातील शेतकऱ्यांना सिंचन सुविधा उपलब्ध व्हाव्यात या उद्देशाने जिल्हा प्रशासनाकडून सहस्त्र सिंचन विहिर योजना राबविण्याची मागणी करण्यात आली होती. या मागणीबाबत जिल्ह्याच्या पालकमंत्र्यांशी झालेल्या चर्चेनंतर शासनाने वाशिम जिल्ह्यात सन २०१७ साठी प्रत्येक तालुक्यात हजार या प्रमाणे सहस्त्र सिंचन विहीर योजना राबविण्यास मान्यता दिली. या योजनेतत अनुक्रमे अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती, भटक्या जमाती, विमुक्त जमाती, दारिद्र्य रेषेखालील इतर कुटुंब, स्त्री कर्ता प्रधान कुटुंब, शारिरिकदृष्ट्या विकलांग कर्ता असलेजले कुटुंब, जमिन सुधारणांचे लाभार्थी, इंदिरा आवास योजनेखालील लाभार्थी, अशा प्राधाण्यक्रमानुसार लाभार्थींची निवड करण्याचे निश्चित झाले. यासाठी किमान ०.६० हेक्टर क्षेत्र असलेले शेतकरी, तसेच एकापेक्षा अधिक मिळून संयुक्त विहिर घेऊ शकणारे आणि ०.६० हेक्टरपेक्षा अधिक क्षेत्र असणारे, तसेच पूर्वीच्या विहिरीपासून किमान ५०० फुट दूर शेत असलेले शेतकरी या योजनेसाठी पात्र आहेत. या लाभार्थींची निवड ग्रामसभेत करण्याचे निश्चित झाल्यानंतर त्यांच्याकडून २५ डिसेंबर २०१६ पर्यंत पंचायत समित्या आणि ग्रामपंचायतींमार्फत अर्ज मागविण्यात आले. त्या प्रक्रियेनंतर लाभार्थींच्या निवडीसाठी ग्रामसभांचे आयोजनही करण्यात आले आणि लाभार्थींची निवडही झाली; परंतु पूर्ण पारदर्शक निवड प्रक्रिया राबविण्यात येत नसल्याच्या आणि हेतूपुरस्सर योजनेपासून वंचित ठेवण्यात येत असल्याच्या तोंडी तक्रारी विविध ठिकाणच्या १५६ पेक्षा अधिक लाभार्थींनी केल्या, तर याच स्वरूपाच्या जवळपास २० तक्रारी गटविकास अधिकारी, मुख्य कार्यकारी अधिकारी आणि जिल्हाधिकाऱ्यांपर्यत करण्यात आल्या आहेत.