शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Vidhan Sabha Election Result 2024 Live: अनेक मतदारसंघांमध्ये उलथापालथ; या क्षणाला कोणी घेतली आघाडी? सर्व अपडेट्स
2
दोघांच्या भांडणात तिसऱ्याचा लाभ! अमित ठाकरे तिसऱ्या क्रमांकावर गेले, सरवणकर दुसऱ्या, पहिला कोण?
3
महायुती-महाविकास आघाडीत ‘काँटे की टक्कर’; भाजपाला सर्वाधिक आघाडी, मनसेची स्थिती काय?
4
Kopri-Pachpakhadi Vidhan Sabha Election Result 2024 Live : ठाण्यातील कोपरी-पाचपाखडीमधून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आघाडीवर, केदार दिघे पिछाडीवर…
5
कोकणात राणे बंधुंपैकी एक आघाडीवर, एक पिछाडीवर; सिंधुदूर्गचा कल कोणाकडे....
6
IND vs AUS : ऑस्ट्रेलियाचा पहिला डाव १०४ धावांत खल्लास! टीम इंडियाला मिळाली अल्प आघाडी
7
Maharashtra Assembly Election 2024 Results Highlights :भाजपाकडून मुख्यमंत्रिपदाचा चेहरा कोण असेल?, राहुल नार्वेकरांनी स्पष्टचं सांगितलं
8
Maharashtra Assembly Election 2024 Result Kandivali Vidhansabha : कांदिवली पूर्वेतून भाजपचे अतुल भातखळकर आघाडीवर, विजयाची हॅटट्रिक मारणार का?
9
शेअर बाजारात ५ महिन्यांचा उच्चांक; गुंतवणूकदारांनी ७.१५ लाख कोटी कमावले
10
अजित पवार गट टेन्शनमध्ये! येवल्यातून भुजबळ, अणुशक्ति नगरमधून नवाब मलिक पिछाडीवर
11
झारखंडमध्ये एनडीए आणि ‘इंडिया’त टफफाईट, सुरुवातीच्या कलांमध्ये दिसतंय असं चित्र
12
बीडमधून मोठी अपडेट; परळी विधानसभेत धनंजय मुंडे पहिल्या फेरीत आघाडीवर!
13
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Results : कोल्हापूर दक्षिणमध्ये मोठी घडामोड, अमल महाडिक २०१२ मतांनी आघाडीवर; कोण मारणार बाजी ?
14
Maharashtra Vidhan Sabha Election Result 2024 बविआला राडा भोवणार! नालासोपाऱ्यात भाजपाचा उमेदवार आघाडीवर, क्षितिज ठाकूरांचा गेम होणार? 
15
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Results : ३५ मतदारसंघात राष्ट्रवादी विरुद्ध राष्ट्रवादी थेट लढत; कोण मारणार बाजी?
16
माहीममधून मोठी बातमी! अमित ठाकरेंची आघाडी, सदा सरवणकर पिछाडीवर
17
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Results Highlights : Video - "पुन्हा एकदा..."; निकालाच्या दिवशी नेतेमंडळी सिद्धिविनायकाच्या चरणी नतमस्तक
18
Maharashtra Assembly Election 2024 Result Dahisar Vidhansabha : दहिसरमधून भाजपच्या मनीषा चौधरी आघाडीवर, तिसऱ्यांदा उतरल्यात मैदानात; उबाठाचे विनोद घोसाळकर पिछाडीवर
19
Maharashtra Assembly Election Result 2024: पहिल्या १३० जागांचे कल हाती, महायुती आणि मविआत काटे की टक्कर, भाजपा वरचढ
20
व्हॉट्सॲप ग्रुपवरून ज्ञान, घरीच केली प्रसूती; चेन्नईतील खळबळजनक घटना

प्रलंबित प्रकल्पांसह पूर्ण झालेल्या प्रकल्पांच्या देखभालीचा प्रश्न लागणार निकाली !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 29, 2017 6:53 PM

जिल्ह्यातील विविध प्रलंबित प्रकल्प, तसेच पूर्ण झालेल्या प्रकल्पांची भविष्याच्या दृष्टीने देखभाल दुरुस्ती आवश्यक आहे. या पृष्ठभूमीवर भाजपा जिल्हाध्यक्ष तथा कारंजा-मानोराचे आमदार राजेंद्र पाटणी यांनी शासनस्तरावर केलेल्या पाठपुराव्याला यश आले आहे.

ठळक मुद्देराजेंद्र पाटणी यांची माहितीजलसंपदा विभागाने घेतली दखल 

लोकमत न्यूज नेटवर्क वाशिम: जिल्ह्यातील विविध प्रलंबित प्रकल्प, तसेच पूर्ण झालेल्या प्रकल्पांची भविष्याच्या दृष्टीने देखभाल दुरुस्ती आवश्यक आहे. या पृष्ठभूमीवर भाजपा जिल्हाध्यक्ष तथा कारंजा-मानोराचे आमदार राजेंद्र पाटणी यांनी शासनस्तरावर केलेल्या पाठपुराव्याला यश आले आहे. या संदर्भात जलसंपदा मंत्री गिरीष महाज यांनी दिलेल्या निर्देशानुसार येत्या ९ डिसेंबर रोजी केंद्रीय जलसंसाधन मंत्री नितिन गडकरी यांच्याकडे सचिवांमार्फत प्रस्ताव मांडण्यात येणार आहेत.  जिल्ह्यातून १० ते १२ नद्यांचा उगम होत असल्याने मोठया व मध्यम सिंचन प्रकल्पांसाठी योग्य स्थळे उपलब्ध नाहीत. जिल्ह्यातील सिंचन प्रकल्पांची कामे जनहित याचिका वनजमिन मान्यता तसेच सुधारीत प्रशासकीय मान्यतेअभावीरखडली आहेत. याची दखल घेत आमदार राजेंद्र पाटणी यांनी मुख्यमंत्री देंवेंद्र फडणवीस आणि जलसंपदा मंत्री गिरीष महाजन यांच्याकडे जिल्ह्याचा प्रकल्प निहाय आढावा घेण्याची विनंती केली. त्यानुसार जलसंपदा मंत्री गिरीष महाजन यांच्या कक्षात २८ नोव्हेंबर रोजी आमदार राजेंद्र पाटणी यांच्यासह जलसंपदा विभागाचे मुख्य सचिव आय. एस. चहल, विदर्भ पाटबंधारे विकास महामंडळ नागपूरचे कार्यकारी संचालक अविनाश सुर्वे, गोदावरी मराठवाडा पाटबंधारे विकास महामंडळ, औरंगाबादचे कार्यकारी संचालक ढंगारे, जलविज्ञान प्रकल्प नाशिकचे मुख्य अभियंता दि. रा. जोशी,अमरावतीचे मुख्य अभियंता संजय घाणेकर व वाशिम जिल्ह्यातील संबंधित अधिकारी आणि जिल्हा उपाध्यक्ष लखनसिंग ठाकूर यांच्या उपस्थितीत चर्चा करण्यात आली.  

टॅग्स :Rajendra Patniराजेंद्र पाटणीDamधरण