संचारबंदी दरम्यान उंबर्डा बाजारसह परिसरातील दुकाने व आस्थापना कडकडीत बंद राहत असून, मेडिकल वगळता एकही दुकान उघडे दिसून येत नाही. गावातील प्रमुख रस्त्यावर निवडक ग्रामस्थांची ये-जा सुरू असल्याचे दिसत असून, गावातील किराणा दुकानासह सार्वजनिक गर्दीचे ठिकाणे सुद्धा निर्मनुष्य झाल्याचे दिसत आहे. संचारबंदी दरम्यान ग्रामीण पोलीस स्टेशनचे ठाणेदार गजानन धंदर यांच्या मार्गदर्शनाखाली चौकी जमादार कैलास गवई, पो. कॉ. नितीन पाटील तथा ग्रामविकास अधिकारी जयकिसन आडे, पटवारी मुंडाळे, पोलीसपाटील उमेश देशमुख यांच्यासह कोरोना आपत्कालीन व्यवस्थापन समितीचे सदस्य महत्त्वाची भूमिका बजावीत आहे.
-----------------------
अंगणवाडी केंद्रात गर्भवतींना मार्गदर्शन
इंझोरी : वाढत असलेल्या कोरोना संसर्गाच्या काळात स्वत:चे आरोग्य सांभाळून पोषण आहार घेण्याबाबत परिसरातील अंगणवाडी केंद्रात अंगणवाडी सेविकांकडून गर्भवतींना मार्गदर्शन केले जात आहे. शनिवारी इंझोरीत हा कार्यक्रम पार पडला.
-----------------------
गुरांचा बाजार पुन्हा बंद
उंबर्डा बाजार : कोरोना संसर्ग नियंत्रणासाठी जिल्हाधिकाऱ्यांनी गुरांचे बाजार भरविण्यावर बंदी घातली आहे. त्यामुळे उंबर्डा बाजार येथे गत काही दिवसांपासून सुरू झालेला गुरांचा बाजार मंगळवारी भरणार नसल्याचे ग्रामपंचायकडून कळविण्यात आले.
-----------------------
पोहरादेवीत २७ जणांंची कोरोना चाचणी
वाशिम : पोहरादेवी येथे कोरोना संसर्गाचे रुग्ण वाढतच आहेत. या पार्श्वभूमीवर ग्रामस्थांची कोरोना चाचणी आरोग्य विभागाकडून केली जात असून, शनिवारी गावातील २७ जणांची कोरोना चाचणी आरोग्य कर्मचाऱ्यांनी केली.