- नंदकिशोर नारेलोकमत न्यूज नेटवर्कवाशिम : शहरातील बगिच्यांना, नगरपरिषद क्षेत्रातील झाडांना देण्यासाठी नगरपालिका शहरातून गोळा करीत असलेल्या कचऱ्यातून स्वत: कंपोस्ट खत तयार करीत आहे. याकरिता शहरातील विविध भागात कंपोस्ट टाक्या (पिट) लावण्यात आले असून यामधून दरमहा ६ ते ७ टन खताची निर्मिती होणार आहे. सदर खत शेतकऱ्यांना देण्याचा निर्णयही नगरपालिकाने घेतला आहे.वाशिम शहरात दररोज सकाळी व संध्याकाळी घंटागाडयांव्दारे ओला व सुक्या कचºयाचे संकलन केल्या जाते. ओल्या कचºयापासून कंपोस्ट खत तयार करण्याचा निर्णय नगरपरिषद अध्यक्ष अशोक हेडा व मुख्याधिकारी गणेश शेटे यांनी घेतला व प्रत्यक्षात कामास सुरुवात करण्यात आली. यासाठी ३ बाय १२ आकाराचे १० कंपोस्ट खत आर्टिफिशियल कंपोस्ट पिट (टाक्या) तयार करण्यात आल्या आहेत. यामध्ये कंपोस्ट खत तयार करण्यास सुरुवात ही करण्यात आली आहे. ४० दिवसानंतर खत तयार झाल्यानंतर याचा वापर करण्यात येणार आहे. सद्यस्थितीत नगरपालिकेच्यावतिने आर्टिफिशीयल कंपोस्ट पिट तयार करण्यात आल्या असल्या तरी शहरातील डंम्पींग गार्डनवर कायमस्वरुपी पीट तयार करण्याच्या कामास सुरुवात करण्यात आली आहे. येत्या दोन महिन्यात हे तयार होणार आहे. आरोग्य विभागाच्या अधिकारी व कर्मचाºयांच्या देखरेखीखाली हे कंपोस्ट खत नियोजनबध्द तयार करण्यात येत असून या उपक्रमाचे शहरवासियांतून कौतूक केल्या जात आहे.शेतकऱ्यांना मिळणार खतवाशिम शहरातील ओल्या कचºयापासून निर्माण होणाऱ्या खताचे प्रमाण जास्त असल्याने सदर खत ज्या शेतकºयांना लागेल त्यांना अल्पदरात उपलब्ध करुन देण्याचा निर्णय नगरपालिकेने घेतला आहे.
वाशिम शहरात घंटागाडयांव्दारे संकलीत करण्यात येत असलेला ओला व सुका कचरा नागरिकांनी वेगवेगळा टाकावा. यामुळे कंपोस्ट खत तयार करण्यास मदत होईल-गणेश शेटे, मुख्याधिकारी, नगरपरिषद वाशिम
शहरवासियांनी प्लास्टिक पिशव्या वापरणे बंद करावे तसेच संकलीत करण्यात येत असलेल्या कचºयामध्ये प्लास्टिक पिशव्या टाकू नये.-अशोक हेडा, नगराध्यक्ष, नगरपरिषद वाशिम