शहरं
Join us  
Trending Stories
1
"शरद पवार फॅक्टर आहेत आणि राहतील, कारण..."; देवेंद्र फडणवीसांचं मोठं विधान
2
"आपण *** मारायची आणि दुसऱ्याचं..."; शरद पवारांचा हसन मुश्रीफांवर हल्लाबोल
3
मोठी बातमी! राज ठाकरेंनी विश्वास टाकला, उमेदवारी दिली, पण त्यानेच ठाकरे गटात प्रवेश केला
4
लुटणाऱ्याचे पैसे घ्या, पण मनसेला मतदान करा; उल्हासनगरच्या सभेत राज ठाकरेंचे वक्तव्य 
5
IND vs SA 4th T20I : अखेर सूर्यकुमार यादवनं टॉस जिंकला, मालिका जिंकण्यासाठी सेट करणार टार्गेट
6
"घुसखोरांसह काँग्रेसलाही बांगलादेशात पाठवायला हवे..."; असं का म्हणाले हिमंता बिस्वा सरमा?
7
अजित पवार, अशोक चव्हाणांचा 'बटेंगे तो कटेंगे'ला विरोध; फडणवीस म्हणाले, "त्यांना समजवून..."
8
विजय शिवतारेंच्या पराभवासाठी अनेकजण देव पाण्यात बुडवून बसलेत; एकनाथ शिंदेंची अजितदादांच्या उमेदवाराविरोधात सभा
9
महायुती सत्तेत आली, तर मुख्यमंत्री कोण होणार? एकनाथ शिंदे अन् अजित दादांचं नाव घेत जयंत पाटलांची भविष्यवाणी!
10
अजित पवारांविरोधात उमेदवार देण्याचं शरद पवारांनी सांगितलं वेगळंच कारण; काय बोलले?
11
माइक टायसनचे 19 वर्षांनंतर कमबॅक, एका फाइटसाठी मिळणार तब्बल 168 कोटी रुपये
12
आता महाराष्ट्राला महिला मुख्यमंत्री मिळालेली पाहण्याची माझी इच्छा; शरद पवारांचे पुण्यात मोठे वक्तव्य
13
देवेंद्र फडणवीसांची भर पावसात सभा; म्हणाले- "पावसात सभा घेतली की सीट निवडून येतेच..!"
14
रॅडिको कंपनीत स्टोरेज टाकीचा स्फोट; शेकडो टन मक्याखाली कामगार दबले, चौघांचा मृत्यू
15
पाकिस्तानला मोठा धक्का! चॅम्पियन्स ट्रॉफी घेऊन PoKमध्ये जायचं नाही, ICCने PCBला ठणकावलं!
16
देव तारी त्याला कोण मारी! चालत्या ट्रेनमधून पडलेल्या प्रवाशाचा आरपीएफ जवानाने वाचवला जीव
17
Raj Thackeray: राज ठाकरे भाषण न करताच भिवंडीतून परतले; प्रकृती अस्वास्थ्यामुळे घेतला निर्णय
18
ट्रम्प विजयाबरोबरच सोन्याचे 'अच्छे दिन' संपले, दिसून आली 3 वर्षातील सर्वात मोठी घसरण! आता खरेदी करायला हवं की नको?
19
'चूक झाली, यापुढे इकडे-तिकडे जाणार नाही', सीएम नितीश कुमारांचा पीएम मोदींना शब्द
20
शशांक केतकर आणि मृणाल दुसानिस तब्बल ४ वर्षांनंतर पुन्हा एकत्र, त्यांची गाजलेली ही मालिका पुन्हा भेटीला

संगणक परिचालकांना चार महिन्यांपासून मानधनच नाही

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 20, 2019 3:29 PM

ग्रामपंचायत अंतर्गत कार्यरत शेकडो संगणक परिचालकांना गेल्या चार महिन्यांपासून त्यांचे मानधन मिळाले नाही.

लोकमत न्यूज नेटवर्कवाशिम: जिल्ह्यातील ग्रामपंचायत अंतर्गत कार्यरत शेकडो संगणक परिचालकांना गेल्या चार महिन्यांपासून त्यांचे मानधन मिळाले नाही. त्यामुळे आधीच तुटपुंज्या मानधनावर काम करीत असलेल्या या संगणक परिचालकांच्या कुटुंबियांवर उपासमारीचीच पाळी आली आहे.वाशिम जिल्ह्यासह संपूर्ण राज्यात २२ हजार संगणक परिचालक ग्रामपंचायत कार्यालयात डिजिटल इंडियाचे कामकाज करीत आहेत. सन २०११ १२ मध्ये संगणकीकृत ग्रामीण महाराष्ट्र अर्थात ही ‘संग्राम’ योजनेंतर्गत या २२ हजार संगणक परिचालकांची नियुक्ती करण्यात आली होती. त्यानंतर २०१६ मध्ये याच संगणक परिचालकांना ‘आपले सरकार सेवा केंद्र’ अंतर्गत केंद्रचालकाचे पद देऊन पुन्हा नियुक्त करण्यात आले. राज्य सरकारने संपूर्ण राज्यात ‘आपले सरकार सेवा केंद्र’ प्रकल्प सुरू केला आहे. या संदर्भातील शासन निर्णयानुसार एका केंद्रचालकाना प्रति महिना सहा हजार रुपये मानधन मंजूर करण्यात आले आहे. कंपनी व्यवस्थापक ४५० रु., स्टेशनरीसाठी २७०० रुपये प्रति महिना आणि प्रशिक्षणसाठी १३०० रुपये व इतर मिळून एकुण १२,५०० रुपये कंपनी आकारते, तरे ग्रामपंचायत एका वर्षासाठी १ लाख ४७ हजार रुपये या कंपनीला देते.यामधूनच नियमित केंद्रचालकांना प्रति महिना सहा हजार रुपये मानधन मिळते. त्यात टीडीएसच्या काही रक्कम कंपनी आपल्या खात्यात ठेवते. हे टीडीएस केंद्रवालकांनाही मिळणे अपेक्षीत असताना अद्याप कोणत्याच संगणक परिचालकाला हे टीडीएस मिळाले नाही.त्यातच या संगणक परिचालकांचे एप्रिल, मे, जुन आणि जुलै मिळून चार महिन्यांचे वेतन संबंधित कंपनीकडे थकले आहे. त्यामुळे जिल्हाभरातील संगणक परिचालकांच्या कुटुंबियांवर उपासमारीची पाळी आली आहे. तालुका आणि जिल्हास्तरावरील अधिकाऱ्यांसह शासनाने या संगणक परिचालकांच्या समस्येची दखल घेऊन तातडीने मानधन अदा करावे, अशी मागणी संगणक परिचालक करीत आहेत. कामबंद आंदोलानाला प्रारंभ !गतवर्षीच्या हिवाळी अधिवेशनात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ग्रामपंचायतीत कार्यरत संगणक परिचालकांच्या समस्यांबाबत बोलताना १० दिवसांच्या आत सर्व समस्यांचा निपटारा करण्यासह संगणक परिचालकांना महाराष्ट्र आयटी महामंडळात नियुक्त करण्याचे आश्वासन दिले होते; परंतु आता ८ महिने उलटले तरी, त्या आश्वासनाची पूर्तता करण्यात आली नाही. तसेच इतरही विविध मागण्या प्रलंबित असल्याने मंगरुळपीर तालुक्यासह राज्यभरातील संगणक परिचालकांनी कामबंद आंदोलन सुरू केले आहे.

मुख्यमंत्र्यांनी संगणक परिचालकांना महाराष्ट्र आयटी महामंडळात नियुक्तीचे आश्वासन दिले होते. आता ८ महिने झाले तरी, त्याची दखल घेण्यात आली नाहीच उलट चार महिन्यांपासून आमचे मानधनही झाले नाही. त्यामुळे आमच्यावर उपासमारीची पाळी आली आहे.-ज्ञानेश्वर मुखमालेमंगरुळपीर तालुकाध्यक्षसंगणक परिचालक संघटना

टॅग्स :washimवाशिमagitationआंदोलनgram panchayatग्राम पंचायत