शहरं
Join us  
Trending Stories
1
‘धर्मयुद्ध’, ‘व्होट जिहाद’वर स्वामी गोविंददेव गिरी स्पष्टच बोलले; म्हणाले, “हिंदू समाजाने...”
2
राज ठाकरेंशी चांगले संबंध होते, अचानक मिठाचा खडा पडून काय बिनसले? CM शिंदेंनी सगळेच सांगितले
3
“महाराष्ट्रद्रोही जिंकणार की महाराष्ट्रप्रेमी जनता हे ठरवणारी निवडणूक आहे”: उद्धव ठाकरे
4
मणिपूरमध्ये सत्ताधारी भाजपला धक्का; NPP ने पाठिंबा काढून घेतला, सरकार कोसळणार?
5
प्रियंका गांधींचे पंतप्रधान मोदींना खुले आव्हान; म्हणाल्या, “एकदा जाहीर करून दाखवा की...”
6
रेवंथ रेड्डींचे अजब आवाहन; म्हणाले, “त्यांच्याकडून भरपूर पैसे घ्या, पण मत काँग्रेसला द्या”
7
माझ्या वडिलांचा फोटो लावणं सोडा, हिंमत असेल तर...; उद्धव ठाकरेंचा पुन्हा घणाघात
8
ठाकरे सेनेच्या मुस्लिम उमेदवाराची मंदिरात पूजा, शिवलिंगाचा अभिषेक अन् आरती केली...
9
नागपूरमध्ये प्रियंका गांधींचा रोड शो; भाजप कार्यकर्त्यांनी दाखवले कमळ, परिसरात प्रचंड तणाव
10
विदर्भात ५४ टक्के जागांवर कुणबी, मराठा उमेदवार; भाजपानं काँग्रेसची केली कोंडी
11
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : उद्धव ठाकरे यांच्यासोबत पुन्हा जाणार का?; एकनाथ शिंदेंनी एका वाक्यात सांगितलं
12
सुपर-डुबर HOT!! भारतीय क्रिकेटपटूच्या बहिणीचा बोल्डनेस, घायाळ करणारा लूक Viral (Photos)
13
माहिमच्या सर्व समाजासह मला मुस्लिमांचाही पाठिंबा; महेश सावंतांना विजयाचा विश्वास 
14
दुगलाईच्या जंगलात पोलिस आणि नक्षलवाद्यांमध्ये चकमक, एक जवान जखमी
15
'मी मुख्यमंत्रीपदाच्या शर्यतीत नाही, पण...', सीएम एकनाथ शिंदेंचं मोठं वक्तव्य
16
पाकिस्तानी लष्कराच्या चेक पोस्टवर दहशतवादी हल्ला, सात सुरक्षा जवान शहीद; १८ जखमी
17
“माझा नाद करायचा नाही, जोरात पाडायचे, संपूर्ण महाराष्ट्रात संदेश गेला पाहिजे”: शरद पवार
18
सतत निष्ठा बदलणारा हा व्यक्ती...; अजित पवारांनी अमोल कोल्हेंचा इतिहासच काढला
19
PM मोदींचे आव्हान राहुल गांधींनी स्वीकारले; बाळासाहेब ठाकरेंबाबत बोलले, पोस्ट करत म्हणाले...
20
हृदयद्रावक! साता जन्माची साथ अवघ्या ७ महिन्यांत सुटली; आक्रित घडलं अन् सारचं संपलं

राज्यभरातील संगणक शिक्षकांना पुनर्नियुक्ती नाहीच!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 11, 2019 4:38 PM

२०१८ मध्ये करार संपल्याच्या नावाखाली कमी केलेल्या सर्वच संगणक शिक्षकांना अद्यापपर्यंत पुनर्नियुक्ती देण्यात आलेली नाही.

- सुनील काकडेवाशिम : केंद्र व राज्य सरकारने विविध कंपन्यांशी करार करून सन २००८ पासून अंमलात आणलेल्या आयसीटी योजनेंतर्गत हजारो शाळांना संगणक संच पुरविण्यात आले. सोबतच सुमारे ८ हजार संगणक शिक्षकांची मानधन तत्वावर नियुक्ती करण्यात आली; मात्र २०१८ मध्ये करार संपल्याच्या नावाखाली कमी केलेल्या सर्वच संगणक शिक्षकांना अद्यापपर्यंत पुनर्नियुक्ती देण्यात आलेली नाही. यामुळे शिक्षकच राहिले नसल्याने शाळांमधील लाखो रुपयांचे संगणक संचही धूळ खात विनावापर पडून आहेत.माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळेतील विद्यार्थ्यांना संगणकीय ज्ञान देण्यासाठी शासनाने २००८ मध्ये आयसीटी योजना अंमलात आणली. त्यासाठी राज्यभरात ८ हजार शिक्षकांची कंत्राटी तत्वावर नियुक्ती करण्यात आली; मात्र या शिक्षकांना कायमस्वरूपी सेवेत रुजू करण्यात आले नाही. याविरोधात संबंधित संगणक शिक्षकांनी कायमस्वरूपी सेवेत रुजू करून घेण्याच्या मागणीसाठी वेळोवेळी आंदोलने केली; परंतु त्याचा कुठलाच फायदा झाला नाही. अशातच कंपन्यांशी केलेला करार संपल्याने २०१८ मध्ये संगणक शिक्षकांची सेवाही संपुष्टात आणण्यात आली. तेव्हापासून आजतागायत या शिक्षकांना पुन्हा नियुक्ती देण्यात आलेली नाही.राज्यभरातील हजारो संगणक शिक्षकांना राज्यशासनाने एकाचेळी बेरोजगार केल्याने त्यांच्या कुटूंबियांवर उपासमारीची वेळ ओढवली आहे. यासंदर्भात मुख्यमंत्री, मानव संसाधन विकास मंत्र्यांकडे सलग पाठपुरावा केला आहे. शासनाने संबंधित शिक्षकांना पुनर्नियुक्ती न दिल्यास आंदोलन छेडले जाईल.- शेखर भोयरसंस्थापक अध्यक्ष, शिक्षक महासंघ, अमरावती

टॅग्स :washimवाशिमTeacherशिक्षक