शिबिराचे उद्घाटन विश्वमांगल्य संघटनमंत्री तेजसाताई जोशी यांच्या हस्ते करण्यात आले. शिबिराची सुरुवात मधुश्री येणेने शंखनाद करून करण्यात आली. यामध्ये मुलांना प्रज्ञाविवर्धन स्तोत्र अनुराधा देशमुख यांनी शिकविले. त्याचप्रमाणे चित्रकला अस्मिता कुळकर्णी व क्राफ्ट सीमा जोशी यांनी , स्नेहलताई दंडे यांनी तीन दिवस योगासने शिकवले. शिबिरामध्ये लहान मुलांनी मोठ्या उत्साहाने सहभाग घेतला व शिबिरामध्ये कथा, गाणे, श्लोक, सुविचार, प्रश्नमंजूषा, पर्यावरणाविषयी माहिती, देशावर माहिती कोणते शोध कोणी लावले त्याच प्रमाणे जिजामाता यांच्या पुण्यतिथीनिमित्त माहिती सांगण्यात आली. आहार तज्ज्ञ प्रा. सुषमा जाजू यांनी आहाराविषयी योग्य मार्गदर्शन मुलांना केले. प्रथम सानवी देशमुख हिने संचालन करून कार्यक्रमाची सुरुवात केली तसेच आरव बडगे व कृष्णाई देशपांडे यांनी दोन दिवस संचलन करून शिबिराची सांगता केली. कार्यक्रमाचे आयोजन विश्वमांगल्य सभेने केले यामध्ये सीमाताई जोशी यांच्या मार्गदर्शनाखाली हा कार्यक्रम पार पडला. या कार्यक्रमांमध्ये सानवी देशमुख, कृष्णाई देशपांडे, आरव बडगे, स्वप्नील देशमुख, आदिनाथ जोशी, राधा लोखंडे, अथर्व गायकवाड, समर्थ गायकवाड, प्रथमेश घोडचर, प्रज्वल घोडचर, अथर्व जामकर, अथर्व महाजन, आर्या जलतारे या मुलांनी सहभाग घेतला. प्रमुख अतिथी म्हणून अंजलीताई कोडापे (विदर्भ प्रांत अध्यक्ष विश्वमांगल्य) व दीपाली ताई देशमुख (अखिल भारतीय बालसभाप्रमुख विश्वमांगल्य सभा) या होत्या. या कार्यक्रमासाठी अनुराधा देशमुख, सीमा जोशी, अनघा बडगे, रेवती भालेराव,स्मिता देशपांडे, स्नेहल दंडे, माधुरीताई दंडे, अस्मिता कुळकर्णी,नीता सरजोशी यांनी परिश्रम घेतले. विश्वमांगल्य सभेच्या अध्यक्ष जयाताई दहातोंडे व उपाध्यक्ष अर्चना सांगाणी सहसंघटक उज्ज्वला घोडचर यासुद्धा यावेळी उपस्थित होत्या.
विश्वमांगल्य बालसंस्कार शिबिराचा समारोप
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 22, 2021 4:27 AM