पावसामुळे मार्गाच्या कामात अडथळे
वाशिम : जिल्ह्यात अधूनमधून पाऊस पडत असताना वातावरणात आर्द्रता निर्माण झाली आहे. त्यामुळे कारंजा-मानोरा या मार्गाच्या कामात वारंवार अडथळा निर्माण होत आहे. पावसामुळे रस्त्यावर चिखल होत असल्याने वाहनधारक त्रस्त झाले आहेत.
पशु लसीकरणाची प्रतीक्षा
वाशिम : मानोरा पशु वैद्यकीय दवाखान्याकडून काही महिन्यांपूर्वी गुरांना लसीकरण करण्यात आले. तथापि, इंझोरी, दापुरा आणि इतर गावांत अद्यापही या मोहिमेची सुरुवात झाली नाही. त्यामुळे पशुपालकांत नाराजीचे वातावरण निर्माण झाले आहे.
वीज वाहिनीमुळे अपघाताचा धोका
वाशिम : कारंजा तालुक्यातील ग्रामीण भागांत काही घरांवरून मुख्य वीजवाहिनी टाकण्यात आली आहे. वीज वाहिनी घराच्या छतापासून अवघ्या दोन फूट उंचीवर आहे. एखादवेळी वादळवाऱ्याने ही वाहिनी तुटल्यास धोका आहे.
फलकाअभावी चालकांची दिशाभूल
वाशिम : कारपा ते मानोरा मार्गाला जोडणाऱ्या आसोला खु. फाट्यावर दिशादर्शक फलक नाही. त्यामुळे या मार्गाने मानोरा किंवा शेंदुरजना आढावकडे जाणाऱ्या नव्या चालकांत संभ्रम निर्माण हाेत आहे.
रस्त्यावरील पूल धोकादायक
वाशिम : रिसोड तालुक्यातील रिसोड ते गोभणी या दोन गावांदरम्यान असलेल्या रस्त्यात पैनगंगा नदीपात्रावरील पूल धाेकादायक झाला आहे.