मालेगाव नगरपंचायतीमधे एकूण १७ वाॅर्ड असून, दलितवस्ती सुधार योजनेअंतर्गत २०१८-१९ मधे २ कोटी ९१ लाख रुपये निधी प्राप्त झाला होता. तसेच २०१९ -२० मध्ये २९ लाख ३० हजार इतका निधी मिळाला होता. या निधीमधून वाॅर्ड क्रमांक ३ मध्ये २०१८-१९ मध्ये ७९९९२५६ रुपये, तर २०१९-२० मध्ये २३२३३२१ रुपये इतका निधी खर्च करण्यात आला . तसेच वाॅर्ड क्रमांक ७ मध्ये ९५५९७९ रुपये, वाॅर्ड क्रमांक ८ मध्ये ७१०५१३४ रुपये तसेच वाॅर्ड क्रमांक ९ मध्ये ५०२५१८ रुपये आणि वाॅर्ड क्रमांक १७ मध्ये १९१११२१ रुपये, असा निधी २०१८-१९ मध्ये खर्च करण्यात आला. हा निधी ज्या वाॅर्डात दलित वस्ती मोठ्या प्रमाणात आहे, त्या वाॅर्ड क्रमांक १३ व १४ मध्ये दिला गेला नाही. मात्र, वॉर्ड क्रमांक १७, ७ व ९ मध्ये दलित वस्ती नसतानासुद्धा मोठ्या प्रमाणात निधी खर्च करण्यात आला. हा दलित बांधवांवर अन्याय असून, याची सखोल चौकशी होणे गरजेचे आहे. त्यावेळी सत्तेत असणाऱ्या पदाधिकारी व अधिकाऱ्यांनी आपल्या पदाचा दुरुपयोग करून हा अनियमितपणा व भ्रष्टाचार केल्याचा आरोप पखाले यांनी केला आहे . वार्ड क्रमांक १३ व ४ मधे ७५ टक्क्यांपेक्षाही अधिक दलित बांधवांची वस्ती असल्यामुळे विकास कामे न झाल्यामुळे त्यांच्यात प्रचंड रोष आहे. याबाबत चौकशी करून दोषींविरुद्ध कारवाई करावी, अन्यथा वाॅर्ड क्रमांक १३ मधील कार्यकर्त्यांसह उपोषण करण्यात येईल, असा इशाराही निवेदनातून दिला आहे.
दलित वस्ती निधी वाटपात गोंधळ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 23, 2021 4:25 AM