गेल्या आठवड्यात, एआयसीटीईने पदव्युत्तर अभियांत्रिकी अभ्यासक्रमाच्या प्रवेश पात्रता निकषांमध्ये बदल केला. गणित, भौतिकशास्त्र हे विषय अकरावी, बारावीच्या स्तरावर अभ्यासण्याचे बंधन शिथील करून तीन विज्ञान विषय घेऊन बारावीची परीक्षा देणाºया विद्यार्थ्यांनाही अभियांत्रिकी प्रवेशाची मुभा दिली. या निर्णयावर मोठ्या प्रमाणात टिका झाली. यानंतर परिषदेने पात्रता निकष निश्चित करण्याची जबाबदारी राज्यांवर किंवा विद्यापीठांवर सोपवली. मात्र, नियम पूर्णपणे मागे घेतला नाही. त्यामुळे राज्यांनी स्विकारल्यास बारावीला गणित आणि भौतिकशास्त्र न घेणाºया विद्यार्थ्यांना अभियांत्रिकीला प्रवेश मिळू शकतो. एआयसीटीई संस्थेने आता १४ विषयांची यादी जाहीर केली असून अभियांत्रिकी प्रवेशासाठी यादीतील १४ पैकी कोणत्याही तीन विषयांमध्ये विद्यार्थ्यांनी किमान ४५ टक्के गुणांसह उत्तीर्ण होणे आवश्यक आहे. यात गणित, भौतिकशास्त्र, रसायनशास्त्र, कम्प्युटर सायन्स, इलेक्ट्रॉनिक्स, माहिती व तंत्रज्ञान, जीवशास्त्र, इन्फॉर्मेशन प्रॅक्टिस, जैवतंत्रज्ञान, टेक्निकल व्होकेशनल सब्जेक्ट, इंजिनिअरिंग ग्राफिक्स, बिझनेस स्टडीज आणि उद्योजकता या विषयांचा समावेश असेल. २०२१-२२ या शैक्षणिक वषासार्ठी एआयटीने एक हँडबुक जारी केले असून, त्यातही याबाबत सर्व माहिती देण्यात आली आहे.
--------
बॉक्स: अभियांत्रिकीचे बेसिक शिक्षणच मिळणार नाही
ह्यबायोमेडिकलह्ण अभियांत्रिकी आणि बायोटेक्नॉलॉजीसारख्या अभियांत्रिकी शाखांनाही गणित आणि भौतिकशास्त्र यांचे ज्ञान आवश्यक आहे. अभियांत्रिकी क्षेत्रात प्रवेश करणाºयांसाठी गणित, फिजिक्स, केमिस्ट्री विषय बंधनकारक नसणे हे धोकादायक ठरू शकते, कारण यामुळे विद्यार्थ्यांना अभियांत्रिकीचे बेसिक शिक्षणच मिळणार नाही, अशी भिती शिक्षणतज्ज्ञांनी व्यक्त केली आहे.
-------------
कोट: अभियांत्रिकी अभ्यासक्रमासाठी गणित आणि भौतिकशास्त्राचा सखोल अभ्यास महत्त्वाचा असतो. त्यामुळेच हे विषय शालेय स्तरावर अभ्यासणे अत्यावश्यकच आहेत, ‘एआयसीटीई’चा निर्णय हा समजून घेणे आवश्यक आहे. अभियांत्रिकीचे नियमित विषय आणि गणित, भौतिकशास्त्राचे मार्गदर्शन वर्ग एकावेळी करणे शक्य नाही.
-अंबादास मानकर, शिक्षणाधिकारी (प्राथमिक)
----------------
कोट: विज्ञान-तंत्रज्ञान शाखांबाबतचा दृष्टिकोन अद्ययावत करण्याची गरज आहे. डॉक्टर्सही गणिताचा अभ्यास करतात. जीवशास्त्रात काम करायचे मग गणित का अभ्यासू अशी भूमिका नुकसान करणारी आहे. अभियांत्रिकीच्या सर्व विद्यार्थ्यांना संपूर्ण एक वर्ष गणित आणि भौतिकशास्त्राचा पाया पक्का करण्यासाठी राखून ठेवले तरच हा निर्णय योग्य ठरेल.
-रमेश तांगडे, शिक्षणाधिकारी (माध्यमिक
----------
कोट: एआयसीटीने केवळ व्होकेशनल कोर्सेसच्या विद्यार्थ्यांना अभियांत्रिकी प्रवेशास मूभा दिली आहे. ज्या विद्याविठात अभियांत्रिकी प्रवेशासाठी सीईटी आवश्यक नाही, अशा विद्यापिठांतर्गत प्रवेशाची संधी व्होकेशनल कोर्सेसच्या विद्यार्थ्यांना मिळू शकेल. त्यानंतरही अभियांत्रिकीच्या प्रथम वर्षांत त्या विद्यार्थ्यांना भौतिकशास्त्र आणि गणिताचा अभ्यास अनिवार्य असेल.
-प्रा. सचिन व्यवहारे
विभागप्रमुख (कॉम्प्युटर शाखा)
----------------------
कोट: एआयसीटीएने अभियांत्रिकी प्रवेशासाठी असलेले भौतिक, गणित विषयांची अट रद्द केली नाही, तर व्होकेशन कोर्सेसच्या विद्यार्थ्यांना अभियांत्रिकी प्रवेशास मूभा दिली आहे. तथापि, त्यांनाही अभियांत्रिकीत प्रवेश मिळण्यासाठी सीईटी परीक्षा द्यावी लागेल. त्यात भौतिक, गणित या विषयांवर आधारीत प्रश्नही असतील.
-प्रा. निरज वालचाळे,
प्राध्यापक (मेकॅनिकल शाखा)
-----
जिल्ह्यातील अभियांत्रिकी महाविद्यालयांची संख्या
०१
एकूण जागा -८३६
रिक्त जागा -५०