वाशिम: शासनाने पेट्रोल, डिझेलसह घरगुती गॅसचे दर वाढविल्याचा निषेध कारंजा तालुका काँग्रेसच्यावतीने गुरुवार १२ एप्रिल रोजी धरणे आंदोलन करून करण्यात आला. यावेळी तहसील कार्यालयासमोर काँग्रेस पदाधिकाºयांनी चुलीवर स्वयंपाक करून निषेध दर्शविला. यावेळी उपविभागीय अधिकाºयांना निवेदनही सादर करण्यात आले.
कारंजा तालुका काँग्रेसच्यावतीने उपविभागीय अधिकाºयांना देण्यात आलेल्या निवेदनात असे नमूद आहे की, सरकारने केलेल्या पेट्रोल, डिझेलसह घरगुती गॅसच्या किमतीत वाढ केल्याचा निषेध करण्यासाठी कारंजा तहसील कार्यालयासमोर कारंजा तालुका काँग्रेस कमिटीच्यावतीने धरणे आंदोलन करण्यात येत आहे. सरकारने पेट्रोल, डिझेल, तसेच स्वयंपाकाच्या गॅसच्या किमतीत भरमसाठ वाढ करून सर्वसामान्यांना जगणे कठीण केले आहे, तसेच मागासवर्गीय समाजाच्याविरु द्ध कोरेगाव भीमा, उणासारख्या दुर्दैवी घटना घडवून सामाजिक तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न करण्यात येत आहे. अशा घटनांचा निषेध करण्यासाठी व शेतकºयांचे सरसकट कर्ज माफ करण्यासह इंधन दरवाढीचा निषेध करण्यासाठीच हे धरणे आंदोलन करण्यात येत आहे. शासनाने पेट्रोल, डिझेलसह घरगुती गॅसमधील दरवाढ मागे घ्यावी, अशी मागणीही या निवेदनातून करण्यात आली आहे. या निवेदनावर राहुलभाऊ ठाकरे, दिलिप भोजराज, माजी जि.प. अध्यक्ष तथा विद्यमान जि.प. सदस्य ज्योती गणेशपुरे, रमेश लांडकर, इसुभ हसन जट्टावाले, उमेश शिसोळे, तात्यासाहेब राऊत, मारोतराव बिल्लेवार, शेख नजिर, कादर अहेमद, हमिद खॉ, किरण धामणकर, उमेश शितोळे, अॅड. सुभान खेतीवाले, अॅड. वैभव लाहोटी, रमेश मुंदे, किरण घुले, यासिन खान, बाबाराव चौके, राज चौधरी, डॉ. गजानन क्षार, विलासबापू देशमुख, प्रकाश निंबलवार, वामन मारोती उगले आदि काँग्रेस पदाधिकारी, कार्यकर्त्यांच्या स्वाक्षºया आहेत.