मानोरा (वाशिम) : नाफेडमध्ये तुर, हरभरा आदी शेतमाल विक्रीसाठी ९०० अर्ज खरेदी-विक्री संघाकडे आले होते. परंतु शासनाची वेबसाईट बंद झाल्यामुळे अनेक शेतकरी वंचित राहिले आहे. दरम्यान, संबंधितांचे अर्ज आॅनलाईन करून त्यांना एक हजार रुपये बोनस द्यावा, या प्रमुख मागणीसह इतर विविध मागण्यासांठी मानोरा तालुका कॉंग्रेसच्यावतीने दिग्रस चौकात ११ जून रोजी रास्तारोको आंदोलन करण्यात आले. मानोरा तालुका खरेदी विक्री संघात तब्बल ९०० शेतकºयांनी आॅनलाईनसाठी अर्ज केले होते, परंतु शासनाची वेबसाईट बंद झाल्याने शेतकरी नाफेडच्या तुर आणि हरभरा विक्रीपासून वंचित राहिले. दरम्यान, राहिलेले अर्ज तत्काळ आॅनलाईन करा व संबंधित शेतकºयांना किमान एक हजार रुपये प्रति क्विंटल याप्रमाणे बोनस द्या, या प्रमुख मागणीसह बोंडअळीग्रस्त शेतकºयांना तातडीने मदत द्यावी, पिक कर्ज मेळावे घेवुन शेतक-यांना तात्काळ कर्ज द्यावे, कर्जमाफीची प्रकरणे तातडीने निकाली काढावी, नाफेडच्या खरेदी केंद्रावर तुर, हरभरा विक्री केलेल्या शेतक-यांना तात्काळ चुकारे देण्यात यावे, आदी मागण्यांसाठी दिग्रस चौकात रास्तारोको आंदोलन करण्यात आले. त्यामुळे काही काळ वाहतुक ठप्प झाली होती. यावेळी बोलताना जिल्हा कॉग्रेस कमेटीचे अध्यक्ष दिलीपराव सरनाईक म्हणाले, की मोदी सरकार हे फसवे असून त्यांच्या कार्यकाळात शेतकºयांची पुरती वाताहात झाली आहे. शेतकºयांना अनेक योजनांचा प्रत्यक्ष लाभ मिळाला नाही. त्यामुळे शेतकºयात असंतोष आहे, असे ते म्हणाले. यावेळी दिलीप भोजराज, शेखर बंग यांनीही मनोगत व्यक्त केले. प्रास्ताविक माजी जि.प.अध्यक्ष अरविंद इंगोले यांनी केले. तालुका काँग्रेसचे अध्यक्ष इफ्तेखार पटेल यांनी संचालन केले. गजानन राठोड यांनी आभार मानले. रास्तारोको आंदोलनात काँग्रेसचे बाजार समितिचे सभापती हरसिंग चव्हाण, नामदेवराव पाटील, समाधान माने, मधुसुदन राठोड, अरविंद राऊत आदि शेतकरी सहभागी झाले होते.
शेतक-यांच्या मागण्यांसाठी काँग्रेसचा रास्तारोको! शासकीय धोरणांचा नोंदविला निषेध
By ऑनलाइन लोकमत | Published: June 11, 2018 4:41 PM