इंधन दरवाढीविरोधात काँग्रेसची निदर्शने

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 12, 2019 03:57 PM2019-07-12T15:57:03+5:302019-07-12T15:58:57+5:30

वाशिम तालुका व शहर काँग्रेस कमिटीच्यावतीने १२ जुलै रोजी स्थानिक पाटणी चौकात निदर्शने करण्यात आली.

Congress demonstrations against fuel hike | इंधन दरवाढीविरोधात काँग्रेसची निदर्शने

इंधन दरवाढीविरोधात काँग्रेसची निदर्शने

Next
ठळक मुद्देभाजप सरकारच्या विरोधात काँग्रेस पदाधिकारी, कार्यकर्त्यांनी घोषणाबाजी केली. भाजपा सरकारचा निषेध असो, अशा घोषणा देत काँग्रेसने आंदोलन छेडले.काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष अ‍ॅड. दिलीवराव सरनाईक यांच्यासह पदाधिकारी, कार्यकर्त्यांची उपस्थिती होती.

लोकमत न्यूज नेटवर्क
वाशिम : पेट्रोल व डिझेल दरवाढ, पीककर्ज वाटपास विलंब, मालाड व तिवरे येथील दुर्घटनेस जबाबदार असणाºयांविरूद्ध कारवाई आदी मागण्यांच्या अनुषंगाने वाशिम तालुका व शहर काँग्रेस कमिटीच्यावतीने १२ जुलै रोजी स्थानिक पाटणी चौकात निदर्शने करण्यात आली. यावेळी भाजप सरकारच्या विरोधात काँग्रेस पदाधिकारी, कार्यकर्त्यांनी घोषणाबाजी केली.
केंद्रीय अर्थसंकल्पाद्वारे कर लावण्याची घोषणा करताच पेट्रोल व डिझेलच्या दरात प्रति लिटर २.५० रुपयांची वाढ झाली. सर्वसामान्य जनतेवर महागाई लादणाºया भाजपा सरकारचा निषेध असो, अशा घोषणा देत काँग्रेसने आंदोलन छेडले. मालाड (मुंबई) येथे भिंत कोसळून २७ बळी गेले तसेच तिवरे जि. रत्नागिरी तेथे धरण फुटल्याने १९ जणांचा मृत्यू झाला व चार जण बेपत्ता झाले. या घटनांमधील दोषींवर कारवाई करण्याबाबत राज्य सरकार गंभीर नाही तसेच पीक कर्ज वाटपाबाबत बँकांकडून सुरू असलेली अडवणूक व राज्य सरकारची उदासिनता मुद्याच्या अनुषंगानेही काँग्रेस पदाधिकार व कार्यकर्त्यांनी निदर्शने दिली. 
या आंदोलनाला काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष अ‍ॅड. दिलीवराव सरनाईक, परशराम भोयर, किसनराव मस्के, दिलीपराव देशमुख, महादेव सोळंके, शंकरराव वानखेडे, वाय. के. इंगोले, अ‍ॅड. पी. पी. अंभोरे, राजुभाऊ वानखेडे, डॉ विशाल सोमटकर, राजु गोडीवले, सागर गोरे, विनोद जोगदंड, मोहन इंगोले, पिरुभाई बेनिवाले, असिफ खान, आरिफ खान, इस्माईल नौरंगाबाडी, गजानन वानखेडे, कुंडलिक वानखेडे, शेख खाजा, उत्तम खडसे, प्रा.दादाराव देशमुख, निलेश मस्के, किशोरअप्पा पेंढारकर, मधुकरराव खरात, सुदाम राठोड, गणेश गायकवाड, शैलेश सारस्कार, गजानन नपते, अब्दुल मतीन, सुभाष देशमुख, भाऊराव डाखोरे, सतीश दुबे, श्रीधर देशमुख, रामदास देशमुख, वसंतराव देशमुख, बाळू कानगुडे, जुनेद भवाणीवाले, कैलास थोरात, सुनील मापारी, गौतम सरकटे, संतोष इंगळे, वैभव देशमुख, अमजद खान शेख रफिक, संजय बनसोड यांच्यासह पदाधिकारी, कार्यकर्त्यांची उपस्थिती होती.

Web Title: Congress demonstrations against fuel hike

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.