‘वंचित’कडून उमेदवारीसाठी काँग्रेस, राकाँ, भाजपाच्या पदाधिकाऱ्यांनी दिल्या मुलाखती !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 16, 2019 02:39 PM2019-07-16T14:39:41+5:302019-07-16T14:40:31+5:30

रिसोड : रिसोड विधानसभा मतदारसंघातून वंचित बहुजन आघाडीकडून उमेदवारी मिळावी यासाठी काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेससह भाजपाच्या पदाधिकाऱ्यांनी १५ जुलै रोजी अकोला येथे मुलाखती दिल्या.

Congress, Ncp, BJP office bearers intervieve for candidature from 'vanchit bahujan aaghadi' | ‘वंचित’कडून उमेदवारीसाठी काँग्रेस, राकाँ, भाजपाच्या पदाधिकाऱ्यांनी दिल्या मुलाखती !

‘वंचित’कडून उमेदवारीसाठी काँग्रेस, राकाँ, भाजपाच्या पदाधिकाऱ्यांनी दिल्या मुलाखती !

googlenewsNext

लोकमत न्यूज नेटवर्क
रिसोड : रिसोड विधानसभा मतदारसंघातून वंचित बहुजन आघाडीकडून उमेदवारी मिळावी यासाठी काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेससहभाजपाच्या पदाधिकाऱ्यांनी १५ जुलै रोजी अकोला येथे मुलाखती दिल्या. विविध पक्षातील नेत्यांनी ‘वंचित’कडे उमेदवारी मागितल्याने जिल्ह्यातील राजकीय क्षेत्रात चांगलीच खळबळ उडाली आहे.
अकोला येथे १५ जुलै रोजी रिसोड विधानसभा मतदारसंघाकरीता इच्छुक उमेदवारांच्या मुलाखती घेण्यात आल्या. यामध्ये वंचित आघाडीबरोबरच काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस, भाजपाच्या पदाधिकाºयांचा समावेश आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी जिल्हाध्यक्ष, माजी जिल्हा परिषद अध्यक्ष तथा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे विद्यमान संचालक दिलिपराव जाधव, भाजपा ओबीसी सेलचे जिल्हाध्यक्ष वामनराव सानप, काँग्रेसचे माजी वाशिम शहर अध्यक्ष तथा वाशिमचे माजी नगराध्यक्ष दिपकराव भांदुर्गे, डॉ. प्रल्हाद कोकाटे, वंचित आघाडीचे प्रा. प्रशांत गोळे पाटील, जानकिराम डाखोरे, अनिल गरकळ, किरण गिºहे, डॉ. रवींद्र मोरे पाटील, सुनील लहाने पाटील, डॉ गजानन हुले आदींनी उमेदवारी मिळण्यासाठी मुलाखती दिल्या. यामुळे राजकीय क्षेत्रात खळबळ उडाली आहे. वामन सानप यांच्याबरोबर त्यांचे वडील तथा भाजपाचे जिल्हा उपाध्यक्ष नारायणराव सानप हे देखील अकोला येथे उपस्थित होते.
यासंदर्भात भाजपा ओबीसी सेलचे जिल्हाध्यक्ष वामन सानप यांच्याशी संपर्क साधला असता ते म्हणाले की वंचित बहुजन आघाडीकडून उमेदवारी मागितली असून, लवकरच माझा पक्षप्रवेश होणार आहे. पक्षप्रवेशाची तारीख अद्याप निश्चित झाली नाही.
राष्ट्रवादी काँग्रेसचे दिलीपराव जाधव यांच्याशी संपर्क साधला असता, अकोला येथे गेलो होतो; परंतू यासंदर्भात ठोस काही बोलणे झाले नाही. पुढे पाहू, अशी सावध प्रतिक्रिया त्यांनी दिली.
(तालुका प्रतिनिधी)

Web Title: Congress, Ncp, BJP office bearers intervieve for candidature from 'vanchit bahujan aaghadi'

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.