लोकमत न्यूज नेटवर्कवाशिम: निसर्गाच्या अनियमिततेमुळे होणारे नुकसान टाळण्यासह रब्बी हंगामात सिंचन करून स्वत:चा आर्थिक विकास साधण्यासाठी जिल्ह्यातील हजारो शेतकऱ्यानी महावितरणकडे कृषीपंप जोडणीसाठी अर्ज केले. त्यापैकी ५११७ शेतकऱ्यानी रितसर पैसे भरूनही त्यांना दोन वर्षांपासून कृषीपंप जोडणीच मिळू शकली नाही. त्यामुळे या शेतकऱ्यांचा सलग दुसरा रब्बी हंगामही हातून जाणार आहे.वाशिम जिल्ह्यातील शेतकºयांना पावसाच्या अनियमिततेचा फटका वारंवार बसतो. अनेकदा अवर्षणामुळे खरीपातील पिकांचे नुकसान होते, तर रब्बी हंगामातही पाणी उपलब्ध असताना वापर करण्यास साधने नसल्याने शेतकऱ्याना स्वत:चा आर्थिक विकास साधणे शक्य होत नाही. असे अनेक शेतकरी शासनाच्या विविध योजनांतर्गत सिंचन विहिरी घेऊन किंवा जिल्ह्यातील जलस्त्रोतांच्या आधारे सिंचन करून आर्थिक स्थिती सुधारण्यासाठी महावितरणकडे अर्ज करीत आहेत. दोन वर्षांच्या काळात ७ हजारांवर शेतकऱ्यांनी असे अर्ज केले. तथापि, त्यापैकी ५ हजार ११७ शेतकºयांनी पैसे भरूनही त्यांना अद्याप वीज जोडणी मिळू शकली नाही. त्यामुळे या शेतकऱ्यांना यंदाही रब्बी हंगामापासून वंचित राहावे लागणार आहे. सौरपंपाबाबत अनेक शेतकरी अनुत्सूकज्या शेतकºयांनी मार्च २०१८ नंतर महावितरणकडे कृषीपंप जोडणीसाठी अर्ज केले. त्या शेतकऱ्यांना पारंपरिक जोडणीसाठी योजना नसल्याने महावितरणने सौरपंप जोडणीचा पर्याय उपलब्ध केला आहे. जे शेतकरी यासाठी तयार आहेत. त्यांना सौरपंप दिलेही जात आहेत. तथापि, अनेक शेतकरी या पर्यायाबाबत उदासीनच असून, पारंपरिक जोडणीसाठी त्यांना याबाबतचा निर्णय होईपर्यंत प्रतीक्षाच करावी लागणार आहे.
महावितरण सध्या उच्च दाब वाहिनी योजना राबवित आहे. त्यात एका शेतकरी ग्राहकासाठी अडीच लाख खर्च येतो. यानुसार ३१ मार्चपूर्वी ज्या शेतकºयांनी पैसे भरले त्यांना जोडणी दिली जात आहे. तथापि, मार्च २०१८ नंतर कोणतीच योजना नसल्याने शेतकऱ्यांना पारंपरिक वीज जोडणी देणे अशक्य झाले आहे.-पी. एम. राठोड,जनसंपर्क अधिकारी,