०००००००००००००००००
कामरगाव येथे एक रुग्ण आढळला
वाशिम : कारंजा तालुक्यातील कामरगाव येथे आणखी एक कोरोना रुग्ण मंगळवारी आढळून आला. कोविड केअर सेंटरमध्ये दाखल करण्यात आले.
०००००
हळद पीक संकटात
वाशिम : विपरीत हवामानाचा फटका हळद पिकाला बसून हे पीक संकटात सापडले आहे. दोन दिवसांपूर्वी जिल्ह्यात काही ठिकाणी वादळ वाऱ्यासह अवकाळी पाऊस झाल्याने हळद पिकाला फटका बसला.
०००००
रिठद येथे आणखी दोन रुग्ण
वाशिम : रिठद येथे आणखी २ जणांचा कोरोना चाचणी अहवाल ४ मे रोजी पॉझिटिव्ह आल्याने गावकऱ्यांची चिंता वाढली आहे. आरोग्य विभागाच्या कर्मचाऱ्यांनी कोरोना बाधितांच्या संपर्कातील नागरिकांची माहिती संकलित करण्याला सुरूवात केली.
000
११० लाभार्थींची नावे शिधापत्रिकांत समाविष्ट
वाशिम : वाशिम तालुक्यातील ११० लाभार्थींची नावे शिधापत्रिकांमध्ये नव्याने समाविष्ट करण्यात आली असून, ७० जणांची नावे शिधापत्रिकांमधून वगळण्याची कार्यवाही करण्यात आली आहे, अशी माहिती पुरवठा विभागाने दिली.
०००००
किन्हीराजा येथे आरोग्य तपासणी
वाशिम : मालेगाव तालुक्यातील किन्हीराजा येथे आणखी तीन जणांचा कोरोना चाचणी अहवाल ४ मे रोजी पॉझिटिव्ह आला. कोरोना बाधित रुग्णाच्या संपर्कातील संदिग्ध रुग्णांची तपासणी आरोग्य विभागातर्फे करण्यात आली.
000
शासकीय कार्यालयांमध्ये खबरदारीचा प्रयत्न
वाशिम : कोरोना विषाणू संसर्गाचे संकट वाढत आहे. यामुळे खबरदारीचा उपाय म्हणून शासकीय कार्यालयात थर्मल गनद्वारे येणाऱ्या नागरिकांची तपासणी केली जात आहे.
0000000000000000000
रेन वॉटर हार्वेस्टिंगकडे लक्ष द्या !
वाशिम : शहरामधील सर्व शासकीय कार्यालये, शाळा-महाविद्यालये, व्यापारी संकुले व सर्व खासगी इमारतींमध्ये रेन वॉटर हार्वेस्टिंगची सुविधा करून ती कार्यरत राहील, याची दक्षता घेण्याचे आवाहन प्रशासनाने केले.
0000000000000000000
पाणीपुरवठा विस्कळीत ; नागरिक त्रस्त
वाशिम : जुने शहरातील पाणीपुरवठा विस्कळीत झाला आहे. नागरिकांना पिण्याच्या पाण्यासाठी दोन ते तीन दिवस प्रतीक्षा करावी लागत आहे. नियमित पाणीपुरवठा करण्याची मागणी या भागातील नागरिकांनी मंगळवारी केली.
000000000000000000000000.
रिक्त पदांमुळे कामकाजाचा खोळंबा
वाशिम : जिल्ह्याच्या कृषी विभागात अनेक महत्त्वाची पदे रिक्त आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांची कामे होण्यास विलंब लागत आहे. कर्मचाऱ्यांची रिक्त पदे भरण्याची मागणी स्वप्नील सरनाईक यांनी जिल्हा अधीक्षक कृषी अधिकाऱ्यांकडे सोमवारी केली.
000000000000000000
बाजारपेठेत फिजिकल डिस्टन्सिंगचा फज्जा
वाशिम : राज्य शासनाच्या आदेशानुसार संचारबंदीच्या मार्गदर्शक सूचना १५ मे पर्यंत लागू करण्यात आल्या आहेत, मात्र बाजारपेठेत सकाळच्या सुमारास फिजिकल डिस्टन्सिंगचे पालन होत नसल्याने या सूचनांकडे नागरिकांचे दुर्लक्ष होत असल्याचे मंगळवारी दिसून आले.
0000000000000000000000000
‘हायमास्ट’ अद्याप बंदच
वाशिम : मालेगाव, शिरपूर, रिसोड, सेनगाव, हिंगोली या ४६१ बी राष्ट्रीय महामार्गाचे नूतनीकरण पूर्ण होऊन काही ठिकाणी हायमास्ट लाईट लावण्यात आले मात्र, विद्युत जोडणी रखडल्याने हे दिवे अद्याप बंदच असल्याचे दिसत आहे.
0000000000000000000000
रीडिंग न घेताच वीज ग्राहकांना देयके
वाशिम : मीटर रीडिंग न घेताच वीज ग्राहकांना अवाच्या सव्वा वीज देयके आकारून ग्राहकांची लूट केल्या जात असल्याचा प्रकार सुरूच असल्याने ग्राहक त्रस्त झाले आहेत. याकडे महावितरणने लक्ष देण्याची मागणी होत आहे..
000000000000000000000000