वाशिम : शहरामध्ये सुरु असलेली विकास कामे निकृष्ट होत असून याकडे संबधितांचे दुर्लक्ष होत आहे. या संदर्भात लोकमतने पाठपुरावा करुन प्रकाशित केलेल्या वृत्ताने अधिकाऱ्यांनी कामांची पाहणी करुन निकृष्ट करण्यात आलेली बांधकामे पाडण्याच्या सूचना केल्या होत्या. २३ मे रोजी निकृष्ट बांधकाम पाडून नविन बांधकामासाठी सेंट्रीग बांधण्यात आल्याचे दिसून आले. याबाबत लोकमतने २२ मे, २३ मे रोजी अग्रकमाने वृत्त प्रकाशित केले होते. रहदारीच्या रस्त्यावर नसलेल्या विकास कामे कशीही केली तरी चालतात, असे समजून विकास कामे निकृष्ट होत असल्याचा भंडाफोड लोकमतने केल्याबरोबरचं अधिकारी, ठेकेदार यांनी निकृष्ट झालेले बांधकाम त्वरित पाडून नविन बांधकामाची उभारणीस सुरुवात केली आहे. वरिष्ठ अधिकारी यांनी होत असलेल्या सर्व कामाची पाहणी करुन कामाचा दर्जा ठरविणे गरजेचे झाले आहे.नागरिकांमध्ये आनंदशहरात सुरु असलेल्या विकास कामे निकृष्ट दर्जाचे होत असल्याचे वृत्त प्रकाशित केल्याने अधिकारी वर्गानी पाहणी केली. पाहणीत काम निकृष्ट दर्जाचे आढळल्याने ते काम पाडून नविन काम करण्यात येत असल्याने शहरातील नागरिकांमध्ये आनंद व्यक्त केल्या जात आहे. २३ मे रोजी सुध्दा ठेकेदारांनी आवर्जुन येवून पाहणी केली.
निकृष्ट करण्यात आलेले नालीचे बांधकाम तोडले
By admin | Published: May 23, 2017 5:52 PM