पर्यावरणाच्या समस्येने सर्वत्र ग्रासले असून पर्यावरणाचे रक्षण आवश्यक बनले आहे. या अनुषंगाने देशाच्या स्वातंत्र्य दिनाचे औचित्य साधून राशी वनाची निर्मिती केली असून राशीनुसार वृक्षांची लागवड करण्यात आली. यावेळी कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी एसएमसी शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष प्रा. हरिभाऊ क्षीरसागर व प्राचार्य मीना उबगडे होत्या. तर, प्रमुख अतिथी म्हणून सामाजिक वनीकरण विभागाचे विभागीय वनअधिकारी लक्ष्मण पाटील यांची प्रमुख उपस्थिती लाभली होती. मान्यवरांच्या हस्ते वृक्षारोपण करण्यात आले.
यावेळी राष्ट्रीय हरित सेनेचे समन्वयक अभिजित मुकुंदराव जोशी, शाळेतील माळी विशाल भंगी, रतन भालेराव, पवन खंडेलवाल, प्रणीता हरसुले, स्मिता पाटील, सुनीता बोरकर, अस्मिता वानखडे, किरण देशमुख, संगीता गाडे, स्वाती बोदडे, संदीप बोदडे, संजय बोदडे, बुद्धिसत्त्व वाकोडे, हिरकांत अंभोरे, वाहनचालक सामाजिक वनीकरण विभाग वाशिम यांचे मोलाचे सहकार्य लाभले. आयाेजन अभिजित जाेशी यांनी केले.